पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

2. प्राचीन हिंदी-प्रातिनिधिक संस्था २११ ४ पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचा उल्लेख करण्यास हरकत नाही. या संस्थेसाठी इतकी कळकळ बाळगणाऱ्या माणसाचे मत विचारांत घेण्यांत आले पाहिजे. हा संस्थेचा हितचिंतक असून तिचे नुकसान व्हावे म्हणून असे सांगतो असे नव्हे. ५ विचार चालला असतांना कोणाला राग येऊन त्याच्या विचारशक्तींत विस्कळीतपणा येईल असे करूं नये, मन शांत असल्यावांचून योग्य विचार सुचत नाहीत हे ध्यानात ठेवून कोणी विचार करतांना . रागावू नये, ६ पुढे काही संकटे येतील असे वाटले तर ती संकटें सांगून ती कशी निवारण करावी हे सांगावें. ७ कोणाला ठपका देणेच असेल तरी तो हळूच द्यावा. कठोर भाषण सुद्धा मऊ असावे. कडू जितके गोड करता येईल तितकें करावें. ८ खरें बोलावे हा नियम खरा. पण ज्यापासून दुःख किंवा अनर्थ ओढवतील असें खरें बोलू नये. त्या वेळी गप्प बसावें. अनर्थकारक गोष्टी बोलण्यापेक्षा गप बसलेलें बरें, विरोधापेक्षां तटस्थपणा ठेवावा म्हणजे मैत्री मोडत नाही. सभेच्या निर्णयाचे तारतम्य खाली दिले आहे. १ ऐकमत्येन दंडनीतिनेत्रेण धीरैः मंत्रितः उत्तमः। २ पूर्व बहुबुद्धयः पश्चादेकमतयो यत्रभवंति स मध्यमः। ३ यत्र कलह, भर्सनच, एकस्य धर्मे, एकस्य अथै, एकस्य स्त्रीबालवृद्धः सहरुदितं, एकस्य क्रोधः यस्मिन् स अधमः। १ धर्म व नीतिशास्त्र यांप्रमाणे विचार करून सगळ्या सभ्यांचा ज्या बाबतींत एकविचार होईल ती उत्तम. यांत सर्वांची व सर्व बाजूंनी विचार करून सुद्धा एकवाक्यता होते त्याअर्थी त्यांत दोष नाहींच म्हणण्यास हरकत नाही. २ ज्या ठिकाणी पहिल्याने भिन्न मते होती पण पुढे विचार व वाद करता करतां एकमत झाले ती सल्ला मध्यम. हीत निरनिराळी मते होण्यास वाव होता पण सारासार विचाराने किंवा कार्यहानी होऊ नये म्हणून किंवा