पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० भावी हिंदी स्वराज्य न [प्र० १२ २ नंतर याबाबद ओळीने एक एकाने आपले मत सांगावे. त्यांत काय करावयाचे आहे हे सांगून तसे केले तर काय होईल, नाही केले तर काय होईल, उलट केले तर काय होईल याचे विवेचन करून काय करावें याबाबद आपले मत स्पष्ट व खुलासेवार सांगावें. IT HPERT 1 ३ सर्वांची बोलणी ऐकून घेतल्यावर एकंदर भाषणांचा निष्कर्ष व त्याबद्दलचे गुणदोष सांगून बहुमताने जसें ठरेल तसे काम करण्याचे ठरवावे. ४ कोणत्याहि कामाबद्दल प्रत्येकाला निरनिराळे विचारावे इतकेंच नव्हे तर सगळ्यांनाहि एकत्र विचारावें व मग त्यांमधील पुष्कळ किंवा जसे केल्याने काम साधेल असे लोक सांगतील तसे करावे, असे कौटिल्य म्हणतो. कौटिल्य केवळ प्रजासत्ताक नाही व यासाठी बहुमताच्या विरुद्ध सुद्धां पण इष्ट हेतु साध्य करता येईल अशा त-हेनें काम करावे असें तो सांगतो. प्रजासत्तेपेक्षां राजसत्तेत इतका विशेष फायदा आहे. - सभेत भाषणे करतांना वक्त्यांनी काय बोलू नये याबद्दल खालील नियम सांगितले आहेत. १ शास्त्रवित् कथं कार्य न प्रजानाति इति न वदेत् । २ चपला न बहुमान्याः ।। ३ पूर्वमपकारं न निवेदयेत्। ४ उपकारं नियतं कुर्याद् । ५मंत्रकाले मंत्रज्ञं न कोपयेत्। ६ भाविव्यसनं पूर्व निवेदयित्वा व्यसनप्रतीकारं निवेदयेत्। ७ बहुवादं मधुरमेव कुर्यात्। ८ सत्यमपि दुःखानर्थसाधनं न वदेत् । १ आपण शहाणे असून हे आपणांस कसे समजत नाही असे बोलू नये, २ वरचेवर ज्यांची मते बदलतात त्यांच्या मताला मान देऊ नये म्हणजे त्यांची मते पुरावा म्हणून घेऊ नयेत. ३ पूर्वी एखाद्याने चूक केली असेल तर तिचा उल्लेख करूं नये, एका गोष्टीत चुकला म्हणून तो नेहमीच चुकतो असे नाही. MEET