पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३. प्राचीन हिंदी-प्रातिनिधिक संस्था २०९ का कार्यसिद्धि काम पुरे करून इष्ट गोष्ट कशी साध्य व्हावयाची याचा विचार.: . FIES - याप्रमाणे कामाचा पांच बाजूंनी विचार करावा लागतो व या पांचहि बाबींचा विचार झाल्यावांचून त्या कामाचा विचार झाला असे म्हणतां येत नाही. यासाठी सभेपुढे कोणतेंहि काम आले म्हणजे त्याचा या पांचहि बाजूंनी विचार झाला असे पाहिल्याशिवाय राहूं नये. स्वार्थप्रेरित होऊन, घाई झाल्यामुळे किंवा गैर माहितपणाने पुष्कळदां एक दोन अंगांचा विचार करून काम करावे असे ठरविण्यात येते व मग तें सुरूं केल्यावर त्यांत दुरुस्ती करता करतां शेवटीं तें काम पुरे होतांना निष्फळ होते. गणपति करावयाचा बेत करून अनेक दुरुस्त्यांमुळे शेवटी त्याचा मारुति होतो. राष्टीय सभेच्या आजपर्यंतच्या कामांत असा पांचहि अंगाने विचार न झाल्यामुळे ती कामे झाली नाहीत अगर झाली तर निष्फळ झाली आहेत. ___ सभेत कामें कशी चालवावी याबाबद खालील नियम - घालून दिले आहेत. १ पूर्व सभापतिना स्वामिकार्यनिवेदनं । कार्यमिदं । एवं आसीद् एवं वा यदि भवेत् तत्कथं कर्तव्यं इति ।। २ ततः यथाक्रम एकैकस्य मतं श्रोतव्यं पूर्व स्वामिकार्य संकीर्त्य स्वामिदोषं परदोषं, मध्यस्थदोषं च मंत्रयित्वा स्वाभिप्रायं निवेदयेत् । ३ सभापतिः पुनः कार्याणि उपायामि च निरूप्य बहुमतानु रोधेन कार्य कल्पयेत् । मा कौटिल्याने देखील याबाबद असेच सांगितले आहे की--- . ४ तत्र एकैकशः पृच्छेत्समस्तांश्च । तत्र भूयिष्ठः कार्यसिद्धि करं वा यथाब्रयुस्तस्था कुर्यात् । १ पहिल्याने सभेपुढे कोणते काम आहे ते सांगावें. "असें करावयाचे आहे पण ते असे होईल किंवा असे झाले तर काय करावे" यांचा विचार आज करावयाचा आहे. DEFEETS भा...हिं...स्व...१४