पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लें.] संघस्थापना ११: सामर्थ्य वगैरे सर्व गोष्टींना लागू आहे. यासाठी आपल्या अनुभवांचा फायदा प्रत्येक संस्थेने इतरांना दिला पाहिजे व तो आपली खरी हकीकत, चुका कशा झाल्या यांची हकीगत प्रसिद्ध केल्याने होणार आहे. संवाने कोणतेंहि काम करावयाचे म्हणजे त्या कामाची प्रसिद्धि करावयाची असते. ही प्रसिद्धि त्या कार्याबद्दल, त्याच्या उपयोगाबद्दल नानाप्रकारची माहिती लोकांच्या कानांवर घालण्याने होत असते. हा संघ झाल्याने फायदे कोणते होतील, कोणते तोटे टळतील, कोणत्या उणीवा भरून निघतील, कोणती सुखें होतील यांचे वर्णन लोकांच्या कानावर गेले पाहिजे, अमक्या मुदतींत हे काम झाले पाहिजे असे म्हटले म्हणजे याला मोहीम म्हणतात. या कामासाठी साधारणपणे सभा व व्याख्याने यांचा उपयोग करण्याचा प्रघात आहे. याच्याबरोबरच वर्तमानपत्रांतून चर्चा हेहि प्रसिद्धि करण्याचे मोठे साधन आहे. या प्रसिद्धि करण्याच्या बाबतीत माणूस उदासीन असूं नये, आपला मित्र व शत्रु हे दोधेहि या कामी सारखेच उपकारक आहेत. गुण व दोष हे दोन्ही चर्चेचे विषयच असल्यामुळे दोष दाखविणे, गुण दाखविण्याइतकेच महत्त्वाचे असते. यासाठी यापैकी कोणतीहि बाजू घेऊन ती वाटेल तितकी गहिऱ्या रंगात रंगविली तरी तें दोषास्पद होत नाही. कारण कोणत्याहि रीतीने जनतेचे लक्ष त्या विषयाकडे जावें इतकांच मुख्य मतलब असतो. लक्ष गेले म्हणजे चांगल्या वाइटाची पारख जनता स्वानुभावावरून आपोआपच करते. यासाठी संघाच्या कार्यात वर्तमानपत्रकारांना तीन कामें करता येतात (१) त्या कार्याची गांवोगांवची बातमी देणे, (२)त्या कार्याबद्दल जाहिराती वगैरे प्रसिद्ध करणे व (३) त्या कार्याच्या गुणदोषाचे विवेचन करणे. पहिल्या सदरांत या प्रकारच्या. संघांनी कोठे काय केले व काय कधी करणार ही स्वदेश व परदेशांतील माहिती द्यावयाची असते. संघाचे स्वतःचे वर्तमानपत्र असले म्हणजे सगळीकडून पत्र येऊन ही माहिती तेथे गोळा होते. परदेशचीहि असलीच वृत्तपत्रे घेतली म्हणजे तिकडील हकीगत कळते व याप्रमाणे इतक्यां संस्थाबद्दल आपलेपणा वाटू लागतो. याप्रमाणे सगळीकडची माहिती गोळा करून प्रसिद्ध करण्याची पद्धति आंगवळणी पडली म्हणजे कोणतेहि लहानमोठे काम याच पद्धतीने सहज होते. हीच पद्धत प्रजातंत्र राजपद्धति हिंदु