पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| २०८ भावी हिंदी स्वराज्यीनार [प्र० १२ हुन अकृतानुरंभ, आरब्धानुष्ठानं, अनुष्ठितविशेषं, कर्मणां नियोगसंपदं च क र असे ते चार प्रकार सांगितलेले आहेत. या (१) अकृनुतारंभं–एखादें नवेंच काम सुरू करण्यासंबंधाचा विचार सभेपुढे येईल, पूर्वी चालू नसलेला नवा कायदा, कर किंवा प्रघात ही एक कामगिरी. (२) आरब्धानुष्ठानं-पूर्वी सुरू केलेले काम तसेच पुढे चालू ठेवणे ही दुसरी कामगिरी. (३) अनुष्ठितविशेषं--पूर्वी केलेल्या कामांत कांहीं फेरफार करून ते प्रस्तुत प्रसंगाला योग्य होईल असे करणे, ही तिसरी कामगिरी. (४) नियोगसंपदं--काम कसे करावें या संबंधाची योजना किंवा हुकम व त्या कामाला लागणारे साहित्य, पैसा, अधिकारी, अधिकार वगैरे पुरविणे ही चौथी कामगिरी. अशीच चार प्रकारची कामें सभेपुढे येतील किंवा यावीत. सभेपुढे येणाऱ्या प्रत्येक कामाचे भाग पडतात व त्या प्रत्येक भागाची योग्य छाननी सभेपुढे झाली पाहिजे. ती अशीः कर्मणामारंभोपायः पुरुषद्रव्यसपद देशकालविभागः विनिपातप्रतीकारः कार्यसिद्धिश्चेति पंचांगो मंत्रः। १ कर्मणामारंभोपायः--कामाची आवश्यकता व त्याला प्रारंभ कसा कोठे व कोणी करावा याची योजना, २ पुरुषद्रव्यसंपद--कामाला लागणारी माणसें, लागणारे सामान, व यासाठी लागणारा पैसा कोणी, कोठून पुरवावा याचा विचार. ३ देशकालविभाग–काम कोणत्या जागी व किती दिवसांत किती मापाचे करावें. निरनिराळ्या जागेवर करण्याचे माप निराळे व तें निरनिराळ्या काळांत पुरे करावयाचे याचा विचार ४ विनिपातप्रतीकार-कामांत येणाऱ्या अडचणी कशा दूर कराव्या, कोणती अडचण कोणी व कशी दूर करावयाची याचा विचार,