पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राचीन हिंदी प्रातिनिधिक संस्था २०७ व सामवेदांत अर्थ निराळा असला पाहिजे हे त्या वेदांच्या नांवांवरून व साध्यावरून उघड आहे. असो. ब्रह्माकडे या सर्व कामांतील चका दुरुस्त करण्याचे काम असल्याने तो तिन्ही वेदांत पारगंत पाहिजे व यासाठी व चोहोकडे नजर ठेवण्यासाठी त्याला चार तोंडे असणे अवश्य आहे. तात्पर्य, अध्यक्ष अगदी सामान्य मनुष्य, सदसस्पति एका शास्त्रांत पारंगत, सभापति व्यवहारनिपुण पण ब्रह्मा मात्र सर्वज्ञ पाहिजे, ज प्रातिनिधिक संस्था या नेहमी सभाच असतात व केव्हां केव्हां या संस्थांना बह्मयाचेंहि काम करावे लागते तरी त्यांचे 'सभापण' काही नष्ट होत नाही. यासाठी इतर जमावांची माहिती विषयांतर म्हणून सोडून देऊन सभांचे काम कसे चालवावे याचे विवरण पुढे केले आहे. सभा या प्रतिनिधींच्या असतात, व प्रतिनिधि हे विशिष्ट गुणसंपन्न मनुष्य असतातच, यासाठी ते सभ्य या पदवीस योग्य होत. सभा कशासाठी भरतात, त्या कशा भराव्या, त्यांत कसे बोलावें, विचार कसा करावा, निर्णय कसा ठरवावा, झालेला निर्णय योग्य केव्हां, कसा व किती वगैरे तपशील पुढील विवेचनांत येईल व यावरून हिंदी लोकांतील प्रातिनिधिक संस्था किती 'प्रगल्भ दशेप्रत गेल्या होत्या व हिंदी लोक त्यांना काही पारखे नाहीत इतकी गोष्ट वाचकांच्या नजरेस येईल. . _एका सभेत कमीत कमी किती सभासद असावे याबद्दल पुष्कळ मतभेद आहे. मनूच्या मताने हे बारा असावेत, बृहस्पतीच्या मताने हे सोळा असाते, उशनसाच्या मताप्रमाणे हे वसि असावेत, कौटिल्याच्या मताप्रमाणे कामाच्या सोईप्रमाणे लागतील तितके हे असावे पण तीन तरी पाहिजेत. वेदाप्रमाणे कमीत कमी पांच व इंद्राच्या सभेत जास्तीत जास्त हजार सभासद आहेत, असे आहे. सर्व लोकांचे मत सभेत विचाराच्या वेळी यावे यासाठी अठरा धंद्यांचे अगर कारखान्यांचे अठरा तरी प्रतिनिधी सभेत हवे असे उशनसाचे मत आहे. प्रत्येक धंद्याच्या लोकांनी निवडलेला एक एक प्रमुख प्रतिनिधि म्हणून सभेत हवा म्हणजे तेथे झालेला निर्णय सर्वमान्य होय असे त्याचे मत आहे. ; सभेत साधारणपणे कोणताहि विषय असला तरी खालील चार सदरांत पडतो. कौटिल्याने आपल्या ग्रंथांत-- पानी