पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०६ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १२ अर्थ करणारे विसरतात. ज्या अर्थी त्यांनी विविक्षित मंत्र अमक्या वेदांत संग्रहीत केला आहे त्याअर्थी त्या वेदांच्या ध्येयाला अनुरूप असा त्याचा अर्थ असला पाहिजे. फार कशाला पण तो वेद शिकणारे लोक सुद्धां त्या त्या गुणांनी युक्त असल्याचे आपण पहातो. साधारणपणे यजुर्वेदी लोक सावकार किंवा संग्राहक असतात. ऋग्वेदी लोक सरळ, स्थिर, हदी. असे असतात, सामवेदी लोक गोड बोलणारे, लघळ, असे असतात. वेद शाखा, गोत्र वगैरे माहिती समजली तर अमुक इसम कोणत्या गणांनी युक्त असेल याचे बरेच अनुमान हिंदुस्थानांत करता येते. हिंदी शास्त्रांचे व हिंदी ग्रंथांचे रहस्य समाजावयाला मनुष्य हिंदीच लागतो, याचें कारण हिंदी लोकांच्या हाडांमासांत हजारों वर्षांच्या सहवासाने त्यांची संस्कृति भिवून गेली आहे. दुसऱ्या लोकांच्या सहवासाने ही ठेवण बिघडलेली असली तरी तिची मोडणी सर्वस्वी विसकटलेली नाही. इंग्रजांच्या किंवा पाश्चात्य लोकांच्या शिकवणीने व सहवासाने वेदांचा अर्थ कळावा अशी हल्ली पुष्कळांना इच्छा उत्पन्न झाली आहे, व ही इच्छा फार चांगली आहे. वेदांत अनेक वर्षांचा अनुभव ग्रथित झाला असून त्यांत पाश्चात्यांना ठाऊक नाहीत अशी अनेक प्रेमये आहेत. ही प्रमेये वेदांचा अर्थ समजल्याने कळतील पण वेदांचा अर्थ करतांना फार धोरण ठेवावे लागते. वेदांतील भाषाहि आंब्यांतील रसाप्रमाणे मूल स्वरूपांत असून अत्यंत लवचिक आहे. काव्य, नाटकग्रंथाप्रमाणे ती स्फटिकमय किंवा आंब्याच्या वड्या, साट यासारखी ताठ झालेली नाही. यामुळे एका शब्दाचे व मंत्राचे अनेक शास्त्रांच्या धोरणाने वेदमंत्रांचे अनेक अर्थ होतात ही गोष्ट ध्यानांत ठेवली पाहिजे. ही गोष्ट विसरल्यामुळे पुष्कळ पाश्चात्य व पौर्वात्य विद्वानांनी केलेले अर्थ अप्रयोजक-संत्रांचा योग्य उपयोग न सांगणारेझाले आहेत. कोणत्याहि मंत्राचा अर्थ करतांना तो कोणत्या वेदांत कोठे आला आहे हे पाहून केला पाहिजे तरच त्याचे रहस्य कळेल हे वरील विवेचनावरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल, पोय म्हटला म्हणजे तो नाटकांत निराळा, हॉटेलांत निराळा, वर्तमानपत्राच्या कचेरीत निराळा, धान्यांत निराळा, झाडांत निराळा आहे. या एका उदाहरणा-वरून एकाच मंत्राचा यजुर्वेदांत अर्थ निराळा, ऋग्वेदांत अर्थ निराळा