पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें.]R प्राचीन हिंदी प्रातिनिधिक संस्था २०६ सेनापति वगैरेंची स्तुति करून सर्व देशांत लढाईचा उत्साह उत्पन्न करणारे वर्तमानपत्रकार, कवि, भाट वगैरे हे उद्गाते. सर्व लढाईवर नजर ठेवणारें में प्रधानमंडळ ते ब्रह्मा, गांवांत आग लागली किंवा पुराचे पाणी शिरले तर त्याचा प्रतिकार करून लोकांचा बचाव करणे हे देखील एक सत्रच आहे. आग विझविण्यासाठी पाणी वगैरे आणणारे लोक हे अध्वर्यु. तें पाणी आगीवर नेमक्या जागी ओतणारे लोक हे होता, गांवांत आगीची दवंडी देणारे किंवा आगीच्या जागी 'भले, एकजोर, जलदी करा' वगैरे शब्दांनी लोकांना प्रोत्साहन देणारे हे उद्गाता, व या सर्व कामांची नीट व्यवस्था ठेवणारे प्रमुख हे ब्रह्मा होत. - सत्रांतील अध्वर्यु हा यजुर्वेदी असावा लागतो, होता हा ऋग्वेदपारंगत हवा, उद्गाता सामवेदनिष्णात पाहिजे व ब्रह्मा हा तिन्ही वेदांतील ज्ञाता पाहिजे. या वेदांची नांवें सार्थ असून त्यांचे विषय त्या नांवांना अनुरूप असे आहेत. यजुष् हा शब्द यज् व उष् या शब्दांचा झालेला असून यज्ञ करून राहील, उरेल असा त्याचा अर्थ आहे. कोणत्याहि यज्ञाला पुरून उरेल इतकी सामुग्री कशी मिळवावी हे यजुर्वेदांत सांगितले आहे व यासाठी अध्वर्यु यजुर्वेद शिकलेला पाहिजे. शस्त्रास्त्रे यांची जमवाजमव, उपयोग सांगणारा धनुर्वेद या यजुर्वेदाचे एक अंग आहे हे वरील विवेचनावरून वाचकांच्या लक्षात येईलच. ऋज हा शब्द स्थिर असणे, ( साध्यावर ) अचल नजर ठेवणे या अर्थाचा आहे व यापासून ऋजु म्हणजे सरळ असा अर्थ होतो. स्थिर रहाण्याला, व्यचल नजर ठेवण्याला शिकविणारा तो ऋग्वेद व होता ऋग्वेद शिकलेलाच ह्वा, औषधांचे प्रमाण व योजना सांगणारा आयुर्वेद हा ऋग्वेदाचा एक भाग आहे हे त्याच्या उपयोगाला व नांवाला धरूनच आहे. साम् म्हणजे शांत करणे, एकी करणे, यापासून लोकांना उत्तेजित किंवा शांत करण्यास शिकविणारा तो सामवेद व उद्गाता सामवेद शिकलेलाच हवा, नाय्यवेद हा सामवेदाचा एक भाग आहे, हे योग्यच आहे. याप्रमाणे वेदांची नांवें सार्थ असून वेदमंत्रांचा अर्थ करतांना नांवाकडे लक्ष ठेवले पाहिजे. एकच मंत्र निरनिराळ्या तीन वेदांत आला तर त्या त्या वेदाच्या नांवाला अनुरूप असे निरनिराळे अर्थ असले पाहिजेत. ही गोष्ट पुष्कळ.