पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ 9 भावी हिंदी स्वराज्य जोर [प्र० १२ विशिष्ट गुणसंपन्न मनुष्य या अर्थाचा यावरून झाला आहे. कार्याकार्याचा निर्णय सभापतीला द्यावयाचा असतो म्हणून तो पुष्कळच लायकीचा इसम लागतो. सभापतीने दिलेला निर्णय सर्व सभ्यांना ग्राह्य व मान्य झाला पाहिजे इतकी जबाबदारी त्याच्यावर असते व ही जबाबदारी पार पाडण्यालायक इसमाला मात्र सभापति निवडला पाहिजे... ४ कोणतीहि अडचण आली असता त्या अडचणींतून पार पाडण्यासाठी जमलेल्या मंडळीच्या जमावाला 'सत्र' म्हणतात. सभा हा शब्द तेजाने युक्त अशा अर्थाचा आहे, व त्यावरून जमलेल्या लोकांचे जस विशिष्टत्व दृष्टोत्पत्तीस येते तसाच 'सत्र' हा शब्द, सत्-त्र चांगले व टिकण्या योग्य अशा गोष्टींचे संरक्षण करणारे, अशा अर्थाचा असून त्या जमावाच विशिष्टत्व दाखविणारा आहे. या सत्राचे जे घटक त्यांना ऋत्विज म्हणतात, ऋतु म्हणजे काळ, परिस्थिति व इज् म्हणजे यज्ञ करणे, स्वार्थत्याग करण, यावरून आपल्या परिस्थितीला किंवा कार्य अगर काळ यांना अनुसरून स्वार्थत्याग करणारे लोक असा ऋत्विज शब्दाचा अर्थ आहे. या ऋत्विजात चार प्रमुख लागतात. त्यांना अध्वर्यु, होता, उद्गाता व ब्रह्मा अशा नाव आहेत. त्यांत सत्राला लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव करून ते वळवर तयार ठेवणे हे अध्वयूवें काम असते, अध्वयूने गोळा केलेले सामान योग्य प्रमाणांत व योग्य वेळी बळी देणे किंवा देवतेला योग्य प्रकारे अर्पण करणे हे होत्याचे काम असतें. होता जो बळी देत असतो त्या बळीचें व ज्या देवतेला देत असतो त्या देवतेची स्तुति किंवा प्रशंसा करणे हे उद्गात्याचे काम असते. अध्वर्यु, होता व उद्गाता यांची कामें कोठे चुकतात की काय हे पाहून होत अगर होणार असलेली चूक दुरुस्त करणे अगर करविणे हे बह्माचे काम असते. वरील विवेचन यज्ञाच्या परिभाषेत केले ते केवळ सोईसाठी केले हे दाखविण्यासाठी सत्रांची एकदोन व्यावहारिक उदाहरणे घेतों म्हणजे यांत कोणाचा गैरसमज होणार नाही. परचक्राची आपल्या देशावर स्वारी झाली असता त्याचा प्रतिकार करणे हे एक सत्र आहे. यांत लढाईसाठी लागणारी माणसे, दारूगोळा, अन्न, वस्त्र वगैरे जमविणारे जे खातें तें अध्वर्यु होय. प्रत्यक्ष रणांगणावर सैन्याच्या हालचाली करणारा तो होता. आपले सैनिक,