पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राचीन हिंदी-प्रातिनिधिक संस्था २०३ जवळ बसणारा,अध्यक्षांचे खालोखाल नजर ठेवणारा तो उपाध्यक्ष. परिषदेस येणारी मंडळी काही विशिष्ट गुणसंपन्न पाहिजेत असे नाही. तसेच तिचे अध्यक्ष व उपाध्यक्ष देखील काही विशिष्ट गुणसंपन्न पाहिजेत असें नाहीं. साधारणपणे ठेवण्यात येत असलेल्या व्यवस्थेत कांही अन्याय झाला तर तक्रार करून निकाल लावून घेण्याची सोय असावी इतकाच या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा उपयोग व काम असते. २ काही तरी ज्ञान संपादन करावे या हेतूनें जी मंडळी जमते त्या जमावाला ' सदस्' असे नाव आहे. या जमावाच्या घटकांना ‘सदस्य' असें नांव असून यांना ज्ञान देणारा जो असेल त्याला 'सदसस्पति' म्हणतात व याच्या हाताखाली त्याला मदत करणाऱ्या या इसमाला 'अनुमति' म्हणतात. सदसस्पति हा ज्या विषयाचे विवेचन होणार त्यांत पारंगत असला पाहिजे व त्या विषयाची माहिती आपणांस मिळावी या इच्छेनें सदस्यांनी तेथे येऊन बसले पाहिजे, परिषदेंतील लोकांनी सोईप्रमाणे बसावें किंवा उभे रहावे पण ' सदस्' किंवा 'संसद् ' मधील लोकांनी बसलेच पाहिजे, शिक्षणाच्या शाळा, शिक्षणासाठी व्याख्याने वगैरे जमाव यांत येतात. परिषदेपेक्षां सदस् किंवा संसद्मध्ये शिस्त पुष्कळ जास्त असते व अध्यक्षापेक्षां सदसस्पतीची योग्यता पुष्कळ जास्त असावी लागते. चाललेल्या ज्ञान चैत अधिकारयुक्त वाणीने त्याला सांगतां व बोलतां येईल इतक्या योग्यतेचा तो इसम लागतो. ___३ कार्याकार्य विचारासाठी योग्य माणसांचा जो जमाव ती 'सभा'. या जमावाच्या मुख्याला 'सभापति' म्हणतात व घटकांना 'सभ्य' अशी संज्ञा आहे. हे सभ्य लोक विशिष्ट गुण संपन्न असावे लागतात, व त्या सर्वांना मान्य व पूज्य वाटेल तोच सभापति होऊ शकतो. प्रतिनिधी वगैरेंची राजकार्यासाठी जुळविलेली ती सभाच असते. या ठिकाणी काय करावे, काय करूं नये, कसे करावे वगैरे गोष्टींचा खल होऊन त्याप्रमाणे करावयाचे असते. परिषदेस लहान पोरापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना जातां येते. संसद्मध्ये ज्याला तो विषय समजेल इतक्या योग्यतेच्या लोकांना जाता येते. पण सभेला विशिष्ट गुण संपन्न लोकांना मात्र येतां येते व इतरांना तींत मुळीच भाग घेतां येत नाही. 'सभ्य' हा शब्द सुद्धा