पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ भावी हिंदी स्वराज्य प्र० १२ इति अमात्य संपद आपले सहकारी म्हणजे आपल्याशी बरोबरीने कामांत मदत करणारी माणसे अशी असावी. आपले मदतनीस गुमास्ते, मुनीम इतक्या प्रकारांनी अशी परीक्षा करून पसंत करावे. - एका माणसांत हे सर्व गुण सांपडणे पुष्कळदां कठीण पडते व यासाठी दोन अगर तीन माणसांची सांगड घालून त्यांच्या ताब्यांत आपले काम द्यावे. एका कचेरीत परस्पर असंबद्ध अशी अनेक माणसे एकत्र कामे करण्यास ठेवण्याचा हाच उद्देश असतो. एक हिशेब ठेवणारा फडणवीस स्वतंत्र, तो हिशेब ठेवण्यास योग्य. एक कामें वेळच्या वेळी व ताबडतोब न्यायनिष्ठुरपणे करणारा स्वतंत्र असा शिरस्तेदार, एक स्वाभिमानी, पराक्रमी, हिम्मतदार, स्वतंत्र अंमलदार, व या तिघांनी मिळून त्या कचेरीचे काम करावे असे ठरविले म्हणजे कामाची हिशेबी परंपरा धरून, तडफेनें कामें करण्याची ढब नीट राहते. प्रतिनिधिसभेत निरनिराळ्या गुणांची निरनिराळी माणसे असल्याने अशीच सुव्यवस्था रहाते. हिंदी शास्त्रकारांनी लोकांच्या जमावाचे चार प्रकार केले आहेत. (१) परिषद् (२) सदस् (३) सभा व (४) संत्र. याबद्दल विचार करून मग प्रतिनिधींच्या सभांच्या कामाबद्दल त्यांचे काय नियम होते ते सांगू. उगीच चैनीसाठी किंवा करमणुकीसाठी जमलेल्या मंडळीच्या जमावास 'परिषद्' म्हणतात. परि म्हणजे सभोवार व षद् म्हणजे बसणारे, कोणाच्या तरी सभोवार बसणाऱ्या लोकांचा जमाव म्हणजे परिषद्, लग्न वगैरे समारंभ, गाणे वगैरेंचे जलसे, पानसुपाऱ्या, गणपति उत्सव, व्याख्याने वगैरे हे असले जमाव होत. या जमावांची जी मांडणी तिला व्यवस्था म्हणतात. वि म्हणजे विशिष्ट प्रकारची, सोईची अव म्हणजे खाली, स्था म्हणजे रहाणे, बसणे, उभे रहाणे इत्यादि. कार्यांच्या सोईप्रमाणे एका विशिष्ट प्रकाराने लोकांनीं रहाणे (उभे अगर बसून) म्हणजे व्यवस्था. ही व्यवस्था ठेवण्याचे काम ज्याच्या नजरेखाली चालतें तो अध्यक्ष. अधि+अक्ष नजरेखाली किंवा नजर ठेवणारा असा त्याचा अर्थ आहे. व या अध्यक्षांचे