पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वे. ]] प्राचीन हिंदीप्रातिनिधिक संस्था २०१ प्रसंगविशेषीं कोणती माहिती कोणत्या शास्त्रांत कोठे सांपडेल हे माहीत असून ती पाहून तिचा उपयोग करण्याचे सामर्थ्य त्याला पाहिजे. ३ कर्मारंभेषु प्रज्ञां धारयिष्णुतां, दाक्ष्यंच। त्याला काही काम करावयाला सांगून त्याची अक्कल, आठवण व हुषारी ओळखावी. सांगितलेले काम त्याच्या लक्षात राहिले पाहिजे व तें करतांना त्याने आपली अक्कल वापरावी व चक करूं नये, मा ४ कथायोगेषु वाग्मित्वं, प्रागल्भ्यं, प्रतिभावत्वं च । ए त्याच्याशी गोष्टी बोलून त्याचे बोलकेपण, धिटाई व समयसूचकता यांची परीक्षा करावी. प्रतिनिधी धीट असावा. भाषा निपुण असावा व झालेली चूक समजली तर लागलीच सावरून घेणारा असावा. ५ आपदि उत्साहप्रभावो, क्लेशसहत्वं च। - त्याला काही अडचणीत पाडून त्याची धमक, पराक्रम व कष्ट सोसण्याची शक्ति यांची परीक्षा करावी. प्रतिनिधीत काम करण्याची धमक, संकटांना तोंड देण्याची शक्ति व लागतील ते कष्ट सोसण्याचे सामर्थ्य हवें. ६ संव्यवहारात् शौचं, मैत्रतां, दृढभक्तित्वं च । त्याच्याशी देवघेव करून ( जेवण सुद्धा यांत येते) त्याची निर्मलता, मैत्री व निश्चल प्रेस यांची परीक्षा करावी. प्रतिनिधि शरीर, मन व आचार यांत निर्मळ पाहिजे, तो सुखदुःखांत आपला भागीदार पाहिजे व आपल्याबर निश्चल प्रेम करणारा पाहिजे. ७ संवासिभ्यः शीलबलारोग्यं सत्वयोगं अस्तंभं अचापल्यं च । त्याचे शेजारीपाजारी यांजपासून त्याची वागणक, शारीरिक शक्ति, निरोगीपणा व पाणीदारपणा, तसेच इंद्रिये दमन करण्याची शक्ति किंवा ब्रह्मचर्य व खोड्या यांची माहिती मिळवावी. प्रतिनिधि सुदृढ, निर्व्यसनी व मन आंवरून धरणारा पाहिजे. ८ प्रत्यक्षतः संप्रियत्वं अवैरित्वं च। । - त्याला स्वतः डोळ्यांनी पाहून त्याचा सुंदरपणा व दंश न धरणे या गुणांची परीक्षा करावी. प्रतिनिधीच्या शरीराची ठेवण अव्यंग व मन उदार असावें. म कर