पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० 9 भावी हिंदी स्वराज्यनीजार प्र०१२ मुख्य पुजारी याच्या पसरलेल्या हातावर टाकल्या वर तीवरील नांव तो मोठ्याने वाचून दाखवी. मग ती चिट्ठी सर्व प्रमुखांकडे देत व ते तें नांव मोठ्याने उच्चारीत व त्या वेळी कोणी हरकत न घेतली तर तो इसम प्रतिनिधि झाला. याप्रमाणे पाहिजेत तितके प्रतिनिधी निवडीपर्यंत काम चाले. प्रतिनिधींनी मतदारांकडे जाऊन मते मागणे व बहुमताने निवडून येणे ही गोष्ट त्या वेळी प्रचारांत नव्हती. ज्याचे वर्तन शुद्ध आहे अशा माणसांची यादी करणे व तातून वाईट ठरतील किंवा म्हणण्यांत येतलि त्यांना गाळण्यांत येऊन उरलेल्या सगळ्या गांवांतील शेलक्या माणसांतून सोडतीने प्रतिनिधी निवडून येत. नेकीने वागणे, धर्मप्रियता, सत्यनिष्ठा वगैरे गुणांना त्या वेळी जास्त महत्त्व असे, व अशा प्रमुख माणसांतून सोडतीने निवड होई. एकदां इतकी माणसे या कारभाराला योग्य आहेत असे ठरल्यावर त्यांतून कोणीहि निवडून आला तरी सारखेच. या यादीत नांव येणे हाच एक मोठा मान समजत; व हा मान मिळविण्यासाठी शुद्ध वर्तन ही कसोटी होती. एका माणसाने दोष काढला तर तो माणूस लागलाच यादीतून गळे. यामुळे निव्वळ स्वच्छ माणसें मात्र यादीत उरत व त्यांतून सोडत होऊन निवडीत. कौटिल्याने राजाने नेमावयाच्या माणसांची परीक्षा कशी करावी हे सांगितले आहे; व प्रजाजनांनी देखील तशीच प्रतिनिधींची निवड केली तर कांहीं वावगे होणार नाही म्हणून ती माहिती खाली दिली आहे. १ तेषां जनपदं, अवग्रहं च आप्ततः परीक्षेत । त्यांचा देश (रीतरिवाज ) व कूळ (आनुवंशिक संस्कार ) हे त्याच्या नातेवाइकांवरून ओळखावे, यावरून नेमावयाच्या माणसांची पूर्वपरंपरा पाहिली पाहिजे असे ठरते. २ समानविद्येभ्यः शिल्पं, शास्त्रचाक्षुष्मतां च। त्यांच्याबरोबर अभ्यास केलेल्या लोकांपासून कामे करण्यांतील त्यांची कुशलता व कोणती शास्त्रे त्यांच्या नजरेखालून गेली आहेत हे ओळखावें. प्रतिनिधि चतुर व शास्त्रे पाहिलेला पाहिजे. तो शास्त्रांत पारंगत नको पण