पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

3.] प्राचीन हिंदी-प्रातिनिधिक संस्था १९९ . ७ गणित-बहुकला-शिल्पविद्--गणित म्हणजे हिशेब, जमाखर्च, आयव्यय, देणे घेणे. प्रतिनिधीला गणित येणे अवश्य आहे. अमुक गोष्ट बरोबर आहे व अमुक बरोबर नाही हे गणिताशिवाय नीट समजत नाही. गणिताचे सिद्धांत बिनचूक व अनपवाद असतात व त्यांच्या परिशीलनाने कांटेकोरपणा व स्पष्टपणा येतो. बहुकला-पुष्कळ कुसराईच्या गोष्टी. या कलांमुळे मनुष्य चतुर होतो. या कलांत चित्रकला प्रमुख आहे. सुतारी, सोनारी, शिंपीपणा किंधा दुसरे कोणतेहि काम करण्यापूर्वी त्या कामाचे चित्र काढले पाहिजे. चित्र काढण्यास कल्पनाशक्ति प्रगल्भ व हात आपल्या ताब्यांत लागतात. कोणतीहि गोष्ट कल्पनेने डोळ्यापुढे उभी करणे व अशा उभ्या केलेल्या गोष्टीचे हाताने चित्र रेघांत काढणे हिला चित्रकला म्हणतात. शिल्पव्यवहारांत उपयोगी पडणाऱ्या वस्तु निर्माण करणे याला शिल्प म्हणतात. वस्त्र, पात्र, घर, वगैरे सर्व सुखसोई शिल्पांत येतात. यांचीहे माहिती प्रतिनिधीला हवी. तात्पर्य, गणित, चित्रे व व्यवहार यांची ज्याला माहिती नाहीं तो प्रतिनिधीत्वाला नालायक असे सुद्धा म्हणता येईल. गणितांत नियामतपणा, चित्रांत चतुरपणा व शिल्पांत दक्षपणा हे तीन गुण प्रमुख होत व यासाठी या गोष्टींची माहिती प्रतिनिधोस हवी.. ८ सूत्रधारः-प्रतिनिधि हा जनतारूपी नौकेचा कर्णधार किंवा रथाचा सारथी होय. जनता कोणीकडे नेली पाहिजे हे ओळखून त्याप्रमाणे हळहळू पण निश्चयाने योग्य सूत्रे हलवून, योग्य फेरफार करून त्याने समाजात कार्य घडवून आणावयाचे असते. आपण काय करतो हे कोणाला समजू न देतां त्यांना इष्ट स्थली घेऊन जाणे हैं सूत्रधाराचे काम होय. हे प्रतिनिधि निवडण्याची प्राचीन पद्धति अशी होती की, वर सांगितलेल्या गुणांनी युक्त अशा माणसांची एक यादी करीत. नालायक माणसे या यादीतून लोकांच्या सूचनेवरून काढून टाकीत. गांवांतल्या प्रमुख देवळांत गांवांतील सर्व प्रमुख माणसें जमून देवाची पूजा करीत व योग्य प्रतिनिधींच्या नांवांच्या चिठ्या करून त्या एका भांड्यांत घालीत. पूजा झाल्यावर देवासमोर सोडतीप्रमाणे या चिठ्या काढीत. काढलेली चिठी