पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०१ तसल्या संस्था काढणारांची हिंमत खचते. अशा त-हेच्या झालेल्या चुकांची माहिती प्रसिद्ध झाली तर इतर लोक सावध होऊन, नवीन कायदे वगैरे करून या चुका टाळण्याचे उपाय अंमलात आणण्यास सोईचे होईल, ज्या देशांत अनेक प्रकारच्या अनेक संस्थांना एकदम अनेक वर्षेपर्यंत पुरेल इतके काम आहे तेथे काही थोड्या संस्था सोडून इतर संस्था निघ. तात व बुडतात हे पाहून साधारण लोक तर गांगरूनच जातात. हा काय खेळ आहे हे त्यांना आकलनच होत नाही. दर आठवड्यास, दरमहा, दरसाल झालेल्या कामाचे सिंहावलोकन व उरलेल्या कामाचा अंदाज प्रसिद्ध होत राहिला पाहिजे, म्हणजे लोकांस काम करण्यास हुरूप असतो. मनुष्य चुकीला पात्र आहे; चुका होतील व त्या झाल्या तर त्या लपवून ठेवू नये. चूक लपविल्याने दुसरा इसम तीच चूक करण्याचा संभव रहातो. यासाठी अमुक चूक झाली म्हणून समजले की, ती जगजाहीर करून टाकावी म्हणजे दुसरे लोक तरी ती चूक करणार नाहीत. व्यवहार हा भवसागर आहे. या समुद्रांतून जात असतांना जर कोणास खडक लागला, वाळचे बेट लागले अगर पाण्यांत भोवरा लागला तर त्याने ती माहिती सर्व गलबतांस कळवावी म्हणजे इतर त्या वाटेने जाणारे लोक सावध होतील. इतिहासाचा उपयोग हाच, चरित्रांचा उपयोग हाच, पुराणांचा उपयोग हाच, व दंतकथांचा उपयोग हाच, अनेक चरित्रे वगैरे ग्रंथ जगांत प्रसिद्ध होतात त्यांचा उपयोग हाच. व्यक्तींच्या चरित्रांपेक्षा आतां संस्थांची चरित्रे प्रसिद्ध झाली पाहिजेत. बुडालेल्या, नाश पावलेल्या संस्थांची चरित्रे तर यशस्वी झालेल्या संस्थांच्या चरित्रांपेक्षा जास्त उपयोगी आहेत. कोणतेंहि काम बरोबर करण्याचा एकच मार्ग असतो व तो सहसा कोणाला सांपडत नसतो. यासाठी अनेक चुकीचे मार्ग, अनेक मार्ग की, ज्या मार्गाने मनुष्य चुकण्याचा संभव आहे हे मार्ग लोकांना जाहीर केले पाहिजेत. असे केले म्हणजे प्रत्येक इसम या अनेक मार्गावरून आपण कोठे आहों हे ठरवील व त्यावरून पुढील मार्ग आंखण्यास त्यास सोईचे होईल याप्रमाणे एखाद्या संस्थेची जरी दहापांच वर्षांची माहिती मधून मधून प्रसिद्ध झाली तरी किती तरी उपयोग होईल व मेहनत वांचेल. इंग्रजीत म्हण आहे की, Money saved is money gained व ही गोष्ट वेळ,