पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १२ ३. परधनतरुणीनिःस्पृहः--विरक्त. दुसऱ्यांचें धन किंवा किंवा पैसा व तरुणी म्हणजे तरुण रूपयौवनसंपन्न स्त्रिया यांची इच्छा सुद्धा मनांत न बाळगणारा, जगांत एकंदर अनेक मोह आहेत व या मोहांत गुंतल्याने मनुष्य स्वकर्तव्यभ्रष्ट होतो. त्या सर्व मोहांत 'कनक' व 'कांता' हे दोन मोह मोठे बलिष्ठ आहेत. या दोहोंना जो कितो तो इतरांना जिंकू शकेल. यासाठी प्रतिनिधि स्वकर्तव्यच्युत होऊ नये म्हणून तो या 'कांतासु कनकेषु च गुंतूं नये. ...४ कर्ममर्मज्ञाता-कामाची खुबी जाणणारा. प्रत्येक कामांत कांही तरी गोम किंवा खुवी असते. ही खुबी जो ओळखतो तोच ते काम नीट करतो. इतर ठिकाणी काम बिघडले तर ते मागाहून सुधारून घेता येते. पण मुख्य खुवी किंवा गोमच जर चुकली तर तें सुधारता येत नाही. यासाठी ही गोष्ट मुख्य संभाळली पाहिजे, कामांत दक्षता पाहिजे ती येथेच, 1.५ दाता-देणारा. प्रतिनिधि घेणारा उपयोगी नाही, पण देणारा पाहिजे. उदार मनाचा, मोकळ्या हाताचा पाहिजे. सार्वजनिक कामांत अनेक धके चपेटे येण्याचा संभव असतो व हे धक्के चपेटे सोसणारा माणूस. उदार मनाचा पाहिजे. अनेक गैरसमज होतील, अनेक निंदांचे प्रसंग येतील, अनेक चुका होतील तर त्या सर्वांना उदार मनाने विसरून जाईल तोच मनुष्य प्रतिनिधित्वाला योग्य.काTETTET ..६ आर्तपाता-दुःखितांचे रक्षण करणारा. प्रतिनिधीच्या हाताखालचे लोक अनेकांना त्रास देतील, दुःख देतील, तर त्या दुःखाचे निवारण करण्यासाठी हाताखालच्या लोकांना आंवरून धरणारा, तसेच हाताखालच्या. लोकांची देखील दुःखें नाहींशी करणारा. तात्पर्य, कोठेहि दुःख असो ते ज्याला पहावत नाही, ते नाहीसे करण्यासाठी जो झटतो तोच पुढारी, पंच किंवा प्रतिनिधि, अन्यायाची चीड, अन्यायाचा तिटकारा लोकांस त्रास न देणे हेच ज्याचे ब्रीद तोच प्रतिनिधि. दुसऱ्या मोबदला काम करणाऱ्या माणसांत दुसऱ्याचे मनाशी तादात्म्य पावण्याचा गुण पाहिजे, व हा गुण असला म्हणजे तो दुसऱ्याचे दुःख नाहीसे करण्यास झटणारच. मंग तो दुसरा कोणीहि असो. दुसऱ्याच्या दु:खाने दुःखित होणारा इसम, अन्याय करणार नाही.