पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें.] प्राचीन हिंदी-प्रातिनिधिक संस्था १९७ त्यांचा स्पष्ट निषेध करणे सूत्रकारांना अवश्य वाटले. चुकून सुद्धा असे होऊ नये म्हणून असे सांगितले आहे, ३ येथपर्यंत आपण प्रतिनिधींचा सामान्यपणे विचार केला, पण प्रातिनिधिक संस्था म्हटल्या म्हणजे सार्वजनिक कामांतील प्रतिनिधींच्या संस्था असा आपण सामान्यत: अर्थ समजतो. खरोखरी संजीवनी विद्येचा उपयोग खाजगी कामांत नसून सार्वजनिक कामांतच जास्त असतो. व्यक्ति आपले खाजगी काम आपल्या आयुष्यभर स्वतंत्रतेने व एकसूत्रीपणाने करीतच असते. सार्वजनिक कामें मात्र एकसूत्रीपणाने चालण्यासाठी त्यांत प्रतिनिधिसंस्थांचे व संघाचे काम लागते. संघ किंवा प्रतिनिधि संस्था नसली तर सार्वजनिक काम एकसूत्रीपणाने व परंपरेने चालणार नाही. ही परंपरा सुटूं नये, एकसूत्रीपणा रहावा म्हणून संघ व प्रतिनिधिसंस्था लागतात, व यासाठी प्रतिनिधिसंस्था म्हणजे सार्वजनिक कामें करणा-या संस्था अशी समजूत रूढ झाली आहे. या सार्वजनिक कामासाठी प्रतिनिधींत कोणते गुण हवेत याचा आतां आपण विचार करूं. कश्यप संहितेत याबाबद हा श्लोक आहे. ब्रह्मज्ञः सत्यसंधः परधनतरुणीनिःस्पृहः कर्ममर्मज्ञाता दातातपाता गणितबहुकलाशिल्पवित्सूत्रधारः ॥ १ ब्रह्मज्ञः-अनुभावक, "पुराकृतं तु यत्तज्ज्ञैस्तद्ब्रह्मेति प्रचक्षते" पूर्वी तज्ज्ञांनी त्या कामांत जे अनुभव घेतले त्यांना ब्रह्म म्हणतात व ब्रह्मज्ञ म्हणजे अनुभव जाणणारा किंवा अनुभविक, वयाने पोक्त असा. स्वतःचे शरीराचा व कुटुंबाचा प्रपंच ज्याने चांगल्या त-हेने केला आहे असा. २ सत्यसंधः-खरे बोलणारा. सत्य म्हणजे चिरकाल टिकण्यास योग्य तें. सत् म्हणजे असणे या धातूपासून हा शब्द आला आहे. संध म्हणजे जोडणारा, तडजोड करणारा, दोन पक्ष दोन बाजूला ओढू लागले असतां त्यांची समजूत घालून चिरकाल किंवा पुष्कळ दिवस टिकेल अशी त्यांच्यांत तडजोड किंवा समेट करणारा. नुसत्या खरें बोलणाऱ्यापेक्षां सत्यसंध या शब्दांत ज्यास्त अर्थ आहे.