पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

को भावी हिंदी स्वराज्य गानाः [प्र० १२ दुःखी, मनुष्यांचा प्रतिनिधि मनुष्य हवा. ज्या ज्या गोष्टींबद्दल त्याने प्रतिनिधित्व करावयाचे ती गोष्ट, तो गुण, ते दुःख, ती अडचण, त्या प्रतिनिधीला होत असली पाहिजे. तसे नसेल तर आपली बाजू त्याला योग्य रीतीने प्रतिपादन करता येणार नाही, मांडतां येणार नाही, लोकांना समजावून सांगता येणार नाही; त्याला ते दुःख किंवा अडचण प्रत्यक्ष झाली असल्याशिवाय त्याचे निराकरण वगैरेच्या मार्गाबाबत त्याला मत देण्याचा अधिकारच पोचत नाही. ज्या जिनसेच्या बदली दुसरी जिन्नस द्यावयाची त्या दुसऱ्या जिनसेंत जर पहिलीचे गुण नसले तर ती बदली कसची? अन्नाचे बदली खावयाची जिन्नस जर खाण्याची जिन्नस नसली, पिणाच्या पाण्याच्या मोबदला द्यावयाच्या जिनसेंत जर पाण्याचे गुण नसले, दिवा किंवा काठीच्या ऐवजी घेतलेल्या जिनसेंत जर दिव्याचे किंवा काठीचे गुण नसले तर ती जिन्नस मोबदला येण्यास योग्य नाही हे अगदी उघड आहे. आतां प्रतिनिधीच्या दोषांचा विचार करूं, आपस्तंबांचे "अप्रतिषिद्धश्च" असे सूत्र आहे. मोबदला घ्यावयाची जिन्नस निषिद्ध मानलेली नसावी. खावयाच्या अन्नाच्या मोबदला विष चालणार नाही. प्यावयाच्या दुधाच्या मोबदला दारू चालणार नाही. मारामारीच्या खटल्यांत दरवडेखोर, खुनी पंच चालणार नाहीत. न्यायाच्या कामांत अन्याय करणारे प्रतिनिधी निरुपयोगी. राजशासनाचे कामांत अराजक प्रतिनिधि निरुपयोगी. तात्पर्य, जी गोष्ट एरवी घेण्यास नालायक, ती मोबदला कशी चालेल? ज्याला मत देण्याचा सुद्धा अधिकार नाहीं तो प्रतिनिधि कसा होईल ? ज्याला हात नाहीत तो नुकर, जे पितांच येणार नाहीं तें पेय, किंवा वाझेच्या मुलाप्रमाणे निषिद्ध प्रतिनिधि हा वदतोव्याघात आहे. चांगली उत्तम विशिष्ट गुणसंपन्न वस्तु मिळत नाही म्हणून तर मुळी मोबदला घ्यावयाची व ती निरुपयोगी घ्यावी असे कोणी तरी म्हणेल काय ? निरुपयोगी जिन्नस मुळी उपयोगी नाही मग ती चांगलीच्या मोबदला कोण घेणार ? व ती घेऊ नये असे सांगण्याची खरोखर किंवा वास्तविक पाहातां जरूरच नाही. पण जगांत गैरसमजाने किंवा अज्ञानाने पुष्कळ घडू नयेत अशा गोष्टी घडतात यासाठी