पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३. प्राचीन हिंदी-प्रातिनिधिक संस्था 'विमृष्टार्थ ' हा मिळेल तितका सर्वज्ञ, आपल्यापेक्षां मिळेल तितका चांगला पाहिजे. उत्तमांत उत्तम मिळेल तितका, शक्य तितका उत्तम माणूस हाच विमृष्टार्थ प्रतिनिधि असणे योग्य. याच्यापुढे आपले सर्वथैव अज्ञान किंवा कमीपणा कबूल करण्यास मालकास लाज वाटू नये, इतक्या योग्यतेचा हा पाहिजे. सर्वात अत्यंत पूज्य व मानार्ह मनुष्य म्हणजे विमृष्टार्थ प्रतिनिधि. गांवांत, राज्यांत एखाद्याचा बहुमान करणे म्हणजे त्याला विमृष्टार्य प्रतिनिधि निवडणे होय, म्युनिसिपालीटीचें, राजसभेचे प्रतिनिधी हे असले प्रतिनिधी होत. यांना जनतेचे नोकर असे कित्येक म्हणतात पण ही चूक आहे. हे जनतेचे नेते, पुढारी, प्रमुख किंवा शास्ते होत, ज्याप्रमाणे पंचांनी दिलेला निवाडा सर्वांनी मुकाट्याने मान्य केला पाहिजे त्याचप्रमाणे या प्रतिनिधीनी केलेले कायदे सर्वांनी मुकाट्याने पाळले पाहिजेत, ते कायदे या प्रतिनिधींनाच बदलतां येतील पण तसे ते बदलले नाहीत तोवर ते प्रत्येकाला पाळले पाहिजेत व बंधनकारक आहेत, अशी स्थिति आहे म्हणून यांना कुलमुखत्यार म्हणतात. कौटिल्याने यांना पूर्ण प्रतिनिधि किंवा आपले आत्मेच असे म्हटले आहे, "आत्मसंपदुपेतो विमृष्टार्थः ।, आपण व आपली संपत्ति ज्यांच्या हाती देतो तो विमृष्टार्थ होय. - याप्रमाणे प्रतिनिधींची अवश्यकता व प्रकार सांगितल्यावर त्यांच्या गुणांबद्दल विचार करूं. आपस्तंबाचे तद्धमास्याद्" असे सूत्र आहे. प्रतिनिधि हा मालकाचे गुणाने युक्त असावा असा याचा अर्थ आहे, म्हणजे जो मत देण्यास लायक तो प्रतिनिधि होग्यास हरकत नाही. मालकाला जे करता येते तें प्रतिनिधीला करता येईल असे पाहिजे. बोलू शकणाऱ्या माणसाचा बोलण्याच्या कामी प्रतिनिधि मुका' असतां उपयोगी नाही. नागरिकांचा नगराधिपत्यासाठी प्रतिनिधि त्या नगराशी संबंध नसलेला चालणार नाही, लोकांचा सुखदुःखें ज्याला समजत नाहीत, त्या सुखदु:खांशी ज्याला सहानुभूति किंवा एकात्मता अगर तादात्म्यता नाहीं तो त्यांचा प्रतिनिधि होऊ शकत नाही. करांचा विनियोग व वसुली ठरविणारा इसम' कर देणारा हवा. काळ्या माणसांचा प्रतिनिधि काळा माणूसच पाहिजे.' गुलामांचा प्रतिनिधि गुलाम, विद्यार्थ्यांचा प्रतिनिधि विद्यार्थी, स्त्रियांचा - प्रतिनिधि स्त्री, सांसारिकांचा प्रतिनिधि संसारी, दुःखितांचा प्रतिनिधि