पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ भावी हिंदी स्वराज्य [प्र० १२ इसम कामाला येतांना फक्त आपले दोन हात मात्र घेऊन येतो म्हणजे काम करतांना ज्याने आपल्या हातांशिवाय बाकी इंद्रीयें गुंडाळून ठेवली पाहिजेत तो 'नकर'. मन, बुद्धि, डोळे, नाक, कान वगैरे इंद्रिये ज्याला असून नसल्यासारखी, त्यांचा उपयोग ज्याने कामांत करावयाचा नाही, मालकाच्या मन, बुद्धि वगैरे इंद्रियांच्या घोरणानेच ज्याने काम करावयाचे तो नोकर. हा मालकाचा फक्त कर्मेंद्रियांपुरतांच प्रतिनिधि म्हणून याला अर्धा प्रतिनिधि म्हणावयाचें, . 7.-२ ज्याला सांगितलेले काम सिद्धीस नेण्यास अवश्य असे सर्व करण्याची मुभा किंवा स्वातंत्र्य आहे तो मितार्थ प्रतिनिधि. राजाचा प्रधान अशिलांचा वकील, यजमानाचा आचार्य हे असले प्रतिनिधी होत. यांना नेमून दिलेले काम सिद्ध करण्याकरतां में लागेल तें करण्याचा अधिकार असतो. मालक गैरमाहित, अशक्त किंवा अज्ञान म्हणून त्याने हे प्रतिनिधी नेमून दिलेले असतात व त्यांनी आपली माहिती, शक्ति किंवा ज्ञान : आपल्या मालकाचे फायद्यासाठी वापरावयाचे असते. हे प्रतिनिधी निरपेक्षतेने काम करीत नसतात, यांचा स्वतःचा स्वार्थ या काम करण्यांत साधाक्याचा असतो व इतक्या अंशाने हे अपूर्ण प्रतिनिधी होत, हे पूर्ण नव्हेत. यांत वैगुण्य किंवा कमीपणा आहे म्हणून यांना कौटिल्याने पाऊण प्रतिनिधी म्हटले आहे. "पादगुणहीनः परिमितार्थः" ज्यांचे प्रतिनिधित्व मोजलेलें ( Limited ) मर्यादित आहे तो पाऊण प्रतिनिधि, ३ कार्याच्या धोरणासाठी जो, सांगितलेलें काम किंवा मालक यांना धाब्यावर बसवू शकतो तो विमृष्टार्थ प्रतिनिधि होय. हा प्रतिनिधि मालकाच्या ताब्यांत नसून उलट मालकच याच्या ताब्यांत असतो, न्यायाचे पंच, राजकार्याचे प्रतिनिधी हे असल्या प्रकारचे प्रतिनिधी होत. हे सांगतील तें मालकांना मान्य करावे लागते; म्हणून हे अत्यंत श्रेष्ठ प्रतिनिधी होत. 'शासनकारक ' अज्ञ असला तरी चालतो इतकेच नव्हे तर तो अज्ञ असेल तितके सोईचे असते. 'मितार्थ' हा एका कामांत तरी पूर्ण वाकब ". असावा लागतो. तो त्या कामांत जितका निष्णात तितका तो अधिक फायदेशीर असतो. मालकापेक्षां शासनकारक कमी ज्ञानी हवा, मितार्थ 'एका, त्याला सांगितलेल्या, कामांत तरी मालकापेक्षां शहाणा हवा. पण