पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.] प्राचीन हिंदी-प्रातिनिधिक संस्था १९३ त्या ठिकाणी हजर अगर तयार नाही हे उघडच आहे. तात्पर्य, प्रतिनिधि निवडावयाचा किंवा नेपावयाचा तो खालील चार कारणांसाठी निवडावा लागतो. १ मुख्य जिन्नस मिळत नाही म्हणून. HTI २ मिळते पण हजर नाही म्हणून. ३ हजर आहे पण तयार नाही म्हणून. ४ अनवस्था प्रसंग येईल म्हणून. मुख्य इसम मयत झाला किंवा मुळीच सांपडत नाही तेव्हां त्याच्याबदली दुसरा इसम घ्यावा लागतो. याला वारस, जिम्मेदार, किंवा विश्वस्त असे म्हणतात. इंग्रजीत याला ट्रस्टी म्हणतात. मुख्य इसम त्या काळी व त्या स्थळी हजर राहू शकत नसला म्हणजे जो त्याचे बदली येतो त्यास गुमास्ता किंवा मुनीम म्हणतात. मुख्य इसम तेथे हजर असून त्याला पुरेसे ज्ञान किंवा शक्ति नाही म्हणून जो इसम बदली नेमतात त्याला उपाध्याय, आचार्य किंवा वकील म्हणतात. मुख्य इसम लायक व तयार आहे पण, ते काम पुष्कळ माणसांनों करावयाचे असल्याने ती सर्व, तें काम करूं लागली तर अनवस्थाप्रसंग येईल म्हणून, ते काम करण्यास त्यांच्या बदली जे नेमतात त्यांना पंच किंवा पुढारी म्हणतात. औशनसाने आपल्या सूत्रांत प्रतिनिधींचे तीन वर्ग केले आहेत. ते असेः - शासनकारक, मितार्थ व विमृष्टार्थ. शासनकारको मितार्थो विमृष्टार्थश्चेति प्रतिनिधयः। या सूत्राचे विवरण टीकाकारांनी खालीलप्रमाणे केले आहे. संदेशकारको यस्तु भवेत् शासन कारकः ॥ मितार्थः कार्यकुर्वाणो न कुर्यादुत्तरोत्तरं ॥ विमृष्टार्थः कार्यवशात् शासनं न करोति यः॥ १ ज्याला सांगितले तितकेच काम करण्याचा अधिकार आहे तो निरोप्या, सांगकाम्या, किंवा नोकर. हा अगदी कमी दर्जाचा प्रतिनिधि. याला कौटिल्याने अर्धाप्रतिनिधि म्हटले आहे. "अर्धगुणहीनः शासनहरः" नोकर हा शब्द कश्यपसंहितेतील 'नृकर' शब्दापासून झाला आहे. जो भा...हि...स्व...१३