पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ भावी हिंदी स्वराज्य नाः . [प्र० १२ केले नाही असे होऊ नये म्हणून त्याला आपल्या ताबेदारांच्या मार्फत परोक्ष कामें करणे भाग पडते. ही परोक्ष कामें करणारी माणसे व त्यांनी करावयाच्या कामाची पद्धत व व्यवस्था राजाने ठरवून दिलेली असते, म्हणून त्या कामांबद्दल तो जबाबदार असतो.. ज्याप्रमाणे कामें वाढल्यामुळे आपली कामे करण्यासाठी राजाला प्रतिनिधी नेमावे लागतात व त्यांच्या कामांची जबाबदारी आपल्या शिरावर घ्यावी लागते त्याचप्रमाणे प्रजाजनांना आपली गा-हाणी राजापुढे मांडण्यास प्रतिनिधी नेमावे लागतात; व त्यांच्या कामाचे सुखदुःख मुकाट्याने सोसावे लागते. प्रजाजनांना देखील पुष्कळ कामें निरनिराळ्या वेळी व एकाच वेळी निरनिराळ्या ठिकाणी करण्याचा प्रसंग येतो व यासाठी त्यांना आपल्यातर्फे गुमास्ते किंवा प्रतिनिधी नेमावे लागतात. हे प्रतिनिधी जसे चांगले अगर वाईट असतील, त्याप्रमाणे ते आपण शिरावर घेतलेले प्रजाजनांचे काम चांगले अगर वाईट करतात; व अशा चांगल्या अगर वाईट कामाचे सुखदुःख प्रजाजनांना सोसावे लागते. याप्रमाणे प्रतिनिधींच्या चांगल्या वाईटपणाचा परिणाम मुख्य इसमाला भोगावा लागतो, म्हणून प्रतिनिधी निवडण्यांत जितकी खबरदारी घ्यावी तितकी थोडीच होते. या कारणाने प्रतिनिधींची निवड, त्यांचे गुण व दोष व त्यांच्या कामाची पद्धत यांचे पुढे सांगितल्याप्रमाणे निमय केले आहेत. 1. आपस्तंब श्रौतसूत्रांत प्रतिनिधि संबंधांत खालील हीन सूत्रे दिली आहेत. शिष्टाभावे सामान्यात्प्रतिनिधिः। तद्धर्मा स्याद् । अप्रतिषिद्धश्च ॥ १ विशेष कामासाठी विशेष प्रकारांनी ज्याचा उल्लेख केला आहे, तो जिन्नस मिळत नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास सामान्य जिनसांतून त्यांचे ऐवजी प्रतिनिधि द्यावा. २ हा प्रतिनिधि त्या विशिष्ट जिनसेच्या गुणांनी युक्त असावा. ३ प्रतिनिधि ज्यांचा स्पष्ट निषेध केला आहे असा नसावा. प्रतिनिधि म्हणजे ऐका जिनसेच्या ऐवजी ठेवलेली दुसरी जिन्नस. ही दुसरी जिन्नस पहिल्या जिनसेच्या बदली ठेवण्याचे कारण ती जिन्नस मिळत नाही किंवा