पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.] . प्राचीन हिंदी-प्रातिनिधिक संस्था ७. आपल्या अनुयायांत भांडणे होऊ नयेत म्हणून मग हा राजा त्यांची भांडणे मिटविण्याचे काम पत्करतो व त्यासाठी नियम करतो. हे नियम म्हणजेच कायदे. राजाकडे याप्रमाणे दुसऱ्या समाजापासून आपल्या समाजाचे व आपल्या समजांतील व्यक्तींचे परस्परांपासून संरक्षण करणे ही राजाची आद्य व मुख्य कामे होत. ही कामे करण्याच्या व ओळखण्याच्या तीन पद्धति बृहस्पतीनी व कौटिल्यांनी सांगितल्या आहेत. प्रत्यक्ष परोक्षानुमेया राजवृत्तिः। राजाची कामें म्हणजे प्रत्यक्ष, परोक्ष व अनुमेय अशी तीन प्रकारची असतात. 'स्वयंकृतं प्रत्यक्षं ' राजाने स्वतः केलेले सर्वाना दिसते ते त्याचे प्रत्यक्ष काम होय, 'परोपदिष्टं परोक्षं ' राजाने दुसऱ्याला करावयास सांगितलेले व राजासाठी दुसन्याने केलेले लोकांनी पाहिले ते राजाचे परोक्ष काम होय. व " कृतेनाकृतान्वेक्षणं अनुमेयं ।” राजाने एक काम केलेले लोकांनी पाहिले व त्यावरून त्याने त्यापूर्वी अमुक कामें केली असली पाहिजेत, एरवी आज केलेले काम करता आले नसते अशी जी कामें ती अनुमेय कामें होत. श्रीरामचंद्रांनी रावणास मारले यांत रामांनी धनुष्यापासून बाण सोडला हे प्रत्यक्ष कर्म व रावण मेला हे प्रत्यक्ष कर्म व यावरून रामांनींच रावण मारला हे अनुमेय कर्म, होय. रामांनी सेतु बांधला हे परोक्ष कर्म होय. रामाच्या आज्ञेनें रामाच्या कामासाठी वानरांनी सेतु बांधला म्हणून सेतु बांधणे हे रामाचे परोक्ष कर्म होय. याप्रमाणे राजाच्या हातून घडणाऱ्या कामांचे प्रत्यक्ष, परोक्ष व अनुमेय असे तीन प्रकार होतात व तिन्ही प्रकारच्या कामांबद्दल राजा जबाबदार होय. राजाने परोक्ष कर्म का करावे व त्याची नसती जबाबदारी आपल्यावर कां घ्यावी असा प्रश्न येतो व त्याचे कौटिल्याने खालीलप्रमाणे उत्तर दिले आहे. कर्मणां अनेकत्वाद् अयोगपद्यत्वाद् अनेकस्थत्वाच्च देशकालव्यत्ययो मा भूदिति (प्रतिनिधि ) अमात्यद्वारा परोक्षं कर्म ॥ राजाला अनेक कामे, अनेक जागी व अनेक वेळी करावयाची असतात व ती करतांना वेळ किंवा जागा यांत चूक पडूं नये किंवा काम