पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९० भावी हिंदी स्वराज्य [प्र. १२ आहे. “जितक्लेशस्य पौरुषं". ज्यानें क्लेश जिंकलेले आहेत, ज्याला क्लेशाचे कांहींच वाटत नाही, क्लेशामुळे ज्याला त्रास किंवा दुःख होत नाहीं तोच पौरुष होईल. " तपसा जितक्लेशो भवति " तपाचे योगानें कष्ट सोसल्याने, शरीराला श्रमांची संवय ठेवल्याने मनुष्य जितक्लेश होतो. ज्याला राजा किंवा पुढारी व्हावे असे वाटत असेल त्याने पौरुषाची खोड किंवा संवय आपल्याला लावून घेतली पाहिजे. पौरुषाची खोड लागण्यासाठी, क्लेशांची पर्वा नाहीशी होण्यासाठी त्याने तपश्चर्या केली पाहिजे. तपश्चर्या म्हणजे कष्ट किंवा श्रम सोसणे. माणसाला जे क्लेश होतात ते अमुक परिस्थिति किंवा प्रकारची राहणी पाहिजे अशी शरीराला संवय झाल्याने होतात. राजा होण्यालायक मनुष्य काही भणंग मिकारी नसावयाचा. मग याला कष्ट सोसण्याची संवय कशी व्हावी ? ही संवय त्याने जाणूनबुजून करावयाची असते. अन्न मिळाले नाही म्हणजे कोणीहि उपाशी रहातोच. पण सुग्रास चमचमीत अन्न घरांत मुबलक असतांना ते सोडून कदान्न भक्षण करणे, मऊ व जाड गाद्या मिळत असतांना घोंगडीवर निजणे, सर्व सोई असतांना उन्हातान्हांतून पायी जाणे, शिपाईप्यादे असतांना एकटे हिंडणे, स्नेहीसोबती असतांना एकांतवासांत काळ वालविणे, अशा वागण्याला व्रताचरण किंवा तपश्चर्या म्हणतात. संपन्न माणसाने अशी तपश्चर्या केल्यावांचून तो जितक्लेश व 'पौरुषे निष्ठित' होत नाही, मग राजा किंवा पुढारी होण्याची गोष्ट लांबच राहिली. गृहस्थांनी नियम पाळावे, व्रते करावी, तपाचरण करावे म्हणून हिंदु धर्मशास्त्र सांगते व या गोष्टी विशेषतः ब्राह्मण व क्षत्रियांनीच केल्याचे पुराणे व इतिहास सांगतात याचे रहस्य हेच, पण हल्ली मात्र ते आचरण सुटले आहे व त्याचे योग्य -तें फळ मिळतच आहे. बृहस्पतींनी आपल्या सूत्रांत " आत्मवान् राजा" अशी व्याख्या केली आहे, 'अत् ' नेहमी जाणे या धातूपासून सारखा जाणारा येणारा तो आत्मा, हा नेहमी प्रयत्न करीत राहण्याचा ज्याचा स्वभाव आहे तो आत्मवान् व हाच योग्य राजा होय, कौटिल्याने " उत्तिष्ठमानः स्वामी" वर उभा राहणारा मालक असे मालकाचे लक्षण केले आहे आहे किंवा मालक असा नेहमी उभा, जागा, सावध “पाहिजे असे सांगितले आहे.