पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1 प्रकरण बाराव या प्राचीन हिंदी-प्रातिनिधिक संस्था अगदी प्राचीन काळी जगांत कोणी राजा नव्हता, जग तेव्हां 'विराज् ' बिनराजाचे होते, प्रत्येक जण आपआपल्या गरजा आपल्या श्रमाने दुसऱ्याला त्रास न देतां भागवू शकत असे. पण पुढे समाजाची वाढ होता होतां असा एक काळ आला की, त्या वेळी एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध आल्याशिवाय भागेना. उदाहरणार्थ, गांवांतील सर्व चांगली जमीन लागवडीखाली येऊन शेतांच्या हद्दी एकमेकांस भिडल्या; शिकारीच्या रानांची देखील हीच स्थिति झाली. एक वस्तु अनेकांना एकाच काळी हवी असे वाटू लागले. असे झाले म्हणजे स्पर्धा, बळजबरी व मारामारीचा प्रसंग येतो व जो जास्त शक्तिमास् , साहसी, कल्पक तो ती वस्तु मिळवितो. दोन इसम भांडूं लागले म्हणजे त्यांचे स्नेही, सोयरे वगैरे या भांडणांत एकएका पक्षास मिळतात व मग त्या मारामाऱ्यांना युद्धाचे स्वरूप येते. या युद्धांत कोणी तरी अधिक साहसी, पराक्रमी, कल्पक असा निघतो व सर्वदा तो सर्वांच्या पुढे असतो. या इसमाला 'पुर एता' पुढे जाणारा, ' पुरुउष्' पुढे राहणारा असें नांव मिळते व हा पुढे, पुढारी या नावाने ओळखला जातो. अगदी पहिला पुढारी म्हणजे अग्नि. इतर प्राण्यांपेक्षा माणसे याचा उपयोग अगोदर करू लागली व याच्या सहाय्यानेच माणसांनी सर्व जग पादाक्रांत केले. अगदी आधुनिक तोफा, बांब म्हणजे अमीच होय. तो लागेल तेव्हां लागेल त्या ठिकाणी सिद्ध करावयाचा म्हणजे झाले. बांब, टार्पेडो हे अग्नि सिद्ध करणारे मंत्र आहेत. औशनसाने आपल्या सूत्रांत " पौरुषे निष्ठितो देवः " असें राजाचे लक्षण केले आहे. नेहमी पुढे राहणारा तो पुरुष, ही खोड म्हणजे पौरुष. ही खोड • ज्याला आहे तो 'पौरुषे निष्ठित' व तोच 'देव ' म्हणजे प्रकाशणारा, वाट दाखविणारा, पुढारी, राजा वगैरे, पुरुष शब्द पुर व. वस् यांपासून झाला