पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संघस्थापना गर यामुळे शहाण्यास तितकेच ज्ञान मिळविण्यास वेड्यापेक्षा कमी काळ व कमी खर्च लागतो. - हल्ली हिंदुस्थानांतील लोकांचे आयुर्मान कमी झाले आहे. पूर्वीच्या शंभर वर्षांपैकी ते सरासरी पंचवीस वर्षांचे हल्ली आहे. ज्ञानसंपादनाची शक्तीहि हिंदी लोकांची कमी झाली आहे. पूर्वी ज्या गोटी शिकण्यास चार वर्षे पुरत त्याच गोष्टी शिकण्यास हल्ली आठ वर्षे लागतात. यामुळे पंचवीसावें वर्षी मरतांना हलीं साधारण माणूस पूर्वीच्या बारातेरा वर्षांच्या पोराइतका शहाणा असतो म्हणजे साधारणपणे बहुतेक माणसे नादान अवस्थेतच हल्ली मरतात. ही गोष्ट लक्षात ठेवून विचार करणाऱ्या माणसांनी कामांची रूपरेषा, पद्धत व आंखणी केली पाहिजे, नाहीतर आईचे आयुष्य पंचवीस वर्षे व तिला गर्भ धारणेस लागणारी वर्षे वीस व बाळंत होण्यास लागणार वर्षे तीस अशी स्थिति होऊन गर्भारपणाचा व्यर्थ शीण मात्र व्हायचा! आपली शक्ति व आयुष्य यांच्या आटोक्यांत कार्यक्रम असला पाहिजे इतकेंच बजावून सांगावयाचे आहे. . कोणत्याहि संघाच्या कार्यात एकसूत्रीपणा व सारखेपणा पाहिजे. प्रत्येक गोष्ट कागदावर मांडलेली असली म्हणजे एका संस्थेच्या अनुभवाचा फायदा दुसऱ्या तसल्या अनेक संस्थांस घेता येतो. कोठन कोणती माहिती मिळविली, तीपासून कोणत्या त-हेने कोणते निर्णय काढले, हे निर्णय अमलांत आणतांना काय अडचणी आल्या व त्या अडचणीतून कसे पार पडलों हैं तपशीलवार संस्थेच्या कचेरीत मांडलेले असावे व ही माहिती जरूर तर इतर तसल्या संस्थांस प्रसिद्ध करून पुरवावी. हिंदुस्थानांत हल्ली अनेक संस्था निघतात व बुडतात; पण या संस्था पहिल्याने काढल्या कशासाठी, त्या कोणत्या कारणाने चालेनाशा झाल्या, त्यांत केलेले अंदाज कोठे व किती चुकले ही माहिती उपलब्ध असेल तर इतर लोकांना किती तरी फायदा होईल, आपली चूक प्रांजलपणे कबूल करण्यांतच खरा थोरपणा आहे. चुका झांकून ठेवल्याने, त्यांवर पांघरूण घातल्याने त्याच त्याच चुका वारंवार होतात व त्या चुका झाल्या होत्या हे इतरांना वेळेवर कळत नाही, अशी माहिती प्रसिद्ध किंवा उपलब्ध होत नसल्याने संस्था बुडाली म्हणजे तिजविषयीं भलतेच गैरसमज व नाना कंड्या उठतात व इतर —