पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य चंद्रगुप्ताचे वेळी चाणक्यांची पद्धति अमलांत होती. मागेस्थानिस, हुएनसंग वगैरेनी ज्या हिंदी राजपद्धतीची इतकी स्तुती केली आहे ती कौटिल्याचीच असावी असे वाटते. पुढे मुसलमानांशी संबंध आल्यावर प्रातिनिधिक संस्थांचे काम ठीक चालेनासे होऊन त्या मोडल्या, त्या आतां फिरून आपण शिकून उपयोगांत आणणार आहों. या कशा मोडल्या वगैरे हकीगत पुढे येईलच, हल्ली औशनस, बृहस्पति व कौटिल्य या तिघांचे मात्र ग्रंथ पाहण्यांत असून त्यांचे अनुरोधाने पूर्वीच्या प्रातिनिधिक संस्था कशा होत्या हे या खंडांत सांगण्याचा विचार आहे.