पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपोद्घात १८७ ...५ भास्वर--या संस्थेत सात सभासद असून हे रंग तयार करण्याचे काम करीत. ही डायर्स गिल्ड् होय. NET .६ अनिल--या संस्थेत सात पोटशाखा असून एकएका पोटशाखेत 'सात सभासद होते. ते साफसफाईचे काम करीत असत. निपज झालेला माल घरोघर फिरविण्याचे काम हे करीत. ही पकर्स युनियन होय, " ७ महाराजिक-या संस्थेचे दोनशे छत्तीस सभासद होते व सर्व खाद्यपेय पदार्थाचा व्यवहार करणे हे काम यांचेकडे होते. यांना सप्लायर्स असोसिएशन् म्हणावें. ८ साध्य-या संस्थेचे एकशे पंचाण्णव सभासद होते व कष्ट करून निरनिराळ्या प्रकारची मजुरी करणे हे यांचे काम होते. ही लेबर युनिअन् होय. ___९ रुद्र-या संस्थेचे अक्रा सभासद असून दवंडी देणे व बातमीची प्रसिद्धि करणे ही यांची कामें होती. यांना असोशिएटेड प्रेस युनियन म्हणता येईल. या सर्व गणांवर एक गणाध्यक्ष नेमला होता, व त्याने यांची कामें कशी चालतात हे पहावयाचे असे, हा गणाध्यक्ष म्हणजे आर्बिट्रेशन बोर्डच होता. _याप्रमाणे देवांनी आपल्याकडे गणांची योजना केल्यावर दानवांवर त्यांना जय मिळाले व शेवटी ते 'अमर' 'निर्जर' या पदव्यांना योग्य झाले. मासिडोनच्या राजाने अथेन्समधून किंवा मराठ्यांनी इंग्रजांकडून ही विद्या संपादन करून उपयोग केला नाही; पण ग्रीसची ही संजीवनीविद्या आज सर्व पाश्चात्य लोकांत पसरली असून जपानच्या 'कचनी मात्र ती त्या देशांत रूढ केली व देवांप्रमाणेच तिचा उत्तम उपयोग करून दाखविला. त्यानंतर या विद्येवर मनु, पराशर, भरद्वाज, विशालाक्ष, कौणपदंत, पिशुन, वातव्याधि व कौटिल्य उर्फ चाणक्य इतके ग्रंथकार झाले. श्रीदाशरथी रामाचे वेळी भरद्वाजांच्या शास्त्राप्रमाणे काम चालत असावे व