पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ भावी हिंदी स्वराज्य ही शुक्राचार्यांची संजीवनीविद्या संपादन करण्यासाठी देवांचे गुरु बृहस्पति यांनी आपला मुलगा कच यास दानवांच्या राज्यांत शुक्राचार्याकडे पाठविले. कच बारा वर्षे दानवांचे राज्यांत राहून शुक्राचार्य दारूच्या गुंगीत बडबडत असतांना त्यांची विद्या शिकून देवांकडे परत आला, हा कच ब्राह्मण कशासाठी आला आहे याची कल्पना दानवांना झाल्यावर त्याचे कार्य होऊ नये म्हणून त्यांनी अनेक खटपटी केल्या. पण कचाचे सौजन्य, देवयानीचे प्रेम व शुक्राचार्यांची गुणलुब्धता यांमुळे त्या सिद्धीस गेल्या नाहीत. अखेर कच ती विद्या संपादन करून देवांकडे आला व त्याने ती आपल्या बापास शिकविली. विद्या संपादन केली तरी अंगी मुरवून, आत्मसात् करून तिचा उपयोग करता येण्यास एक बुद्धिसामर्थ्य व धोरण लागते तें कचांत नव्हते म्हणून त्याची ती विद्या बृहस्पति शिकले व त्यांनी तिजवर 'बृहस्पति ' सूत्रे केली. या सूत्रांत बृहस्पतींनी शुक्राचार्याच्या पद्धतीचे दोष दाखवून त्या दोघांच्या निराकरणाचे मार्ग सुचविले आहेत. बृहस्पतींच्या सूत्रांप्रमाणे देवांनी आपल्यांत गणसंस्था स्थापन केल्या. गणसंस्था नऊ होत्या त्या खाली दिल्याप्रमाणे:- बार १ आदित्य- या संस्थेत बारा सभासद असून आकाशांतील ज्योतीं, निरीक्षण व त्यांचा अभ्यास करीत, तात्पर्य हे ज्योतिषी कालगणक होते. ही अॅस्ट्रा नामिकल सोसायटी होय. .२ विश्वे-या संस्थेत तेहतीस सभासद असून शिल्पविद्यांचा अभ्यास यांत चाले. मनुष्यांच्या सुखसोईसाठी लागणाऱ्या सर्व वस्तु निर्माण करणे हे यांचे काम होते. ही इंजिनीयर्स इनस्टिटयूट म्हणता येईल. "_३ वसु--या संस्थेत आठ सभासद असून खाणीच्या कामाचा हे विचार करीत. खनिज द्रव्ये काढणे व त्यांचा उयोग करणे ही यांर्ची कामें होती. ही मायनर्स युनियन होय. ४ तुषित-या संस्थेत छत्तीस सभासद होते. धान्याचा, भुसार मालाचा व्यवहार हे पहात असत. यांना कोआपरेटिव्ह आग्रिकल्चरिस्ट म्हणता येईल. मान ना