पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माता की परंपरा खंड जमाना अजमलाया छ। पूर्वी कृतयुगांत देवदानवांची लढाई चालली असतांना देवांनी एखादा दानव वीर मारावा व त्या बाजूस दानवांचा पक्ष लंगडा होईल अशी अपेक्षा करावी. पण तसे होत नसे. त्या बाजूची सर्व व्यवस्था पूर्वीप्रमाणे कायमच असे. हे असे कसे होते हैं देवांना समजत नसे व दानवांचा गुरु शुक्राचार्य याजपाशीं संजीवनी-विद्या,मेलेले वीर जिवंत करण्याची युक्ति, आहे अशी त्यांची समजूत होती. अलीकडच्या काळांत ग्रीस देशांत मासिडोनचा राजा फिलिप हा असे म्हणत असे की, “माझ्या तीस वर्षांच्या कारकीर्दीत मला पार्मिअनशिवाय दुसरा सेनापति मिळाला नाही, व हे अथेनियन लोक दरसाल नवा सेनापति नेमतात. ही गोष्ट होते तरी कशी ? यांना इतके सेनापति मिळतात तरी कुठले ?" अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे मराठे व इंग्रज यांची गांठ पडली तेव्हां इंग्रजांचे सेनापति वरचेवर बदलतात, नवीन येतात तरी त्यांच्या कामाची शिस्त व टापटीप बिघडत नाही; पण इकडे होळकरांना, शिंद्यांना दक्षिणेत न्यावे तर उत्तरेचा बंदोबस्त करण्यास कोणी नाही अशी आपली अवस्था होते; एक नानाफडणवीस कैदेत पडला तर त्याची जागा भरून काढण्यास दुसरा इसम मिळत नाही हे काय गौडबंगाल आहे असे मराठ्यांना वाटे, या सर्वांचे कारण हेच की, शुक्राचार्याप्रमाणे ग्रीस व इंग्रज यांजपाशी संजीवनीविद्या आहे. ही संजीवनी विद्या म्हणजे प्रातिनिधिक संस्था होत. या प्रातिनिधिक संस्थांमुळे हरएक कामाचे माहितगार असे अनेक लोक निर्माण होतात. सवाना सर्व कामें माहीत असतात असे जरी नाहीं तरी पुष्कळांना एका कामाची माहिती प्रातिनिधिक संस्थांमुळे होते व यामुळे कोणत्याहि कामाची विविक्षित व्यक्तीसाठी खोटी होत नाही. या प्राचीन प्रातिनिधिक संस्थांची माहिती " औशनस" सूत्रांत दिली आहे.