पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०११ त्यांनी आपल्या परिस्थितीला योग्य असे नमुने तयार करावे व त्याबरहुकूम फायदे होतात असे दाखवून कारखाने वगैरेंत योजना कराव्या. दरएक युनिव्हर्सिटींत व्यवहार-लौकिक व्यवहार-हें एक शास्त्र शिकवावें. प्रत्येक शाळेत नागरिकांची कर्तव्ये यावर धडे देत जावे व व्यावहारिक राजकारण तर प्रत्येक मुलाला कृतीने आचरूं द्यावें, देशांत जी अवस्था असावी असे आपणांस वाटते तिचे चित्र अगोदर प्रत्येक तरुणाच्या डोळ्यासमोर उभे करावे व मग त्याबरहुकूम त्यास आचरण करू द्यावे.