पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामाजिक सुधारणा धंदशिक्षण व कारखाने यांच्या योगाने हिंदुस्थानांतील दारिद्य समूळ घालवितां येईल. कित्येक लोक दारिद्य म्हणजे परमार्थाचे साधन समजतात. पण ही चूक आहे, अन्न असून नियम म्हणून उपाशी राहण्यांतच खरे पुण्य आहे. न मिळेल त्या दिवशी उपास म्हणजे काही पुरुषार्थ नव्हे. मोठ्या प्रमाणावर मालाची निपज व सहकारी दुकानामार्फत त्याची विक्री याच्या योगाने हि गरीबांची पुष्कळ सोय करता येईल, मालकांनी मजूरांना जास्त पगार व सुखसोई द्याव्या असे म्हणतांना मजुरांनी देखील आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. त्यांनी झटून व व्यवस्थित रीतीने काम केले पाहिजे. कामकऱ्यांची आळस. व हयगय करण्याची संवय कायदा व लोकमत यांनी घालविली पाहिजे व असें झाले म्हणजे काम जास्त होऊन जास्त पगार देण्यास अडचण पडणार नाहीं. आजार व उपासमार गेली म्हणजे आळस कमी होईल असे म्हणण्यास हरकत नाही. चढाओढीमुळेच बाजारभाव उतरावा, याखेरीज त्याला दुसरा मार्ग असूं नये, त्याचप्रमाणे मिळेल तितका नफा उपटावा ही, पद्धति गेल्याशिवाय गरीबांचे हाल नाहीसे होणे शक्य नाही. प्रत्येकाने सर्वांसाठी व सर्वांनी प्रत्येकासाठी झीज सोसण्याचा प्रघात पडल्याशिवाय मालक व मजूर यांचा झगडा संपणार नाही. यासाठी उक्तं काम, नफ्याचा हिस्सा, वगैरे उपायांचा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही. तात्पर्य, मजुरांनी जास्त उपज करावी व मालकांनी जास्त मजुरी द्यावी अशा दोन्ही बाजूनी ही सुधारणा झाली पाहिजे. मजूर कोणीकडे, कसे व कशासाठी जातात याची चौकशी करून त्यांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले पाहिजे. या मंडळाने इतर देशांचा अनुभव पाहून तज्ञ व अधिकारी यांच्या सल्ल्याने खूब मेहनत घेऊन काय करावे हे ठरवावे. या मंडळांत सगळे हिंदी पुढारीच असावे. परदेशाचे व्यापारी, धंदे अगर कारखाने यांच्या वाढीपासून आपणांस पुष्कळ गोष्टी शिकावयाच्या आहेत. संघांच्या मार्फत परदेशांत समंजस लोक पाठवून माहिती मागवून त्याप्रमाणे योजना करून सामाजिक व संघटित कार्याची दिशा हिंदी लोकांस लावली पाहिजे.