पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० ११ योग्य शिस्त लावतां येईल; पण त्याहीपेक्षां सहकारी लहान लहान धंदे व कारखाने यांमुळेच योग्य वळण लागणारे आहे. निरनिराळ्या कामाला वाहून घेतलेल्या संघांमार्फत ही शिस्त लागण्यासारखी आहे. मजुरांत मजूरसंघांनी शिस्त उत्पन्न केली पाहिजे. मालकांनी मजुरांना अयो वाटेवर समोर जाऊन भेटण्याचा प्रयत्न केल्यास मजूरसंघांपासून संप वगैरे त्रास होईल. पण ज्यापासून मुळीच त्रास होणार नाही अशी कोणतीच गोष्ट जगांत उत्पन्न झाली नाही. 'सर्वारंभाहि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः' ज्याप्रमाणे विस्तव पेटवावयाचा म्हटला की, धूर व्हावयाचाच, तसेंच कोणतेंहि काम करावयाचे म्हटले म्हणजे त्यांत काही दोष यावयाचेच. जास्त नफा आहे व दोष थोडे आहेत हे पाहून गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. हिंदुस्थानांत संघ होऊ लागले म्हणजे मजुरांचे देखील संघ होणारच व मजूर व मालक यांच्या संयुक्त मंडळाने दोघांचहि हित कशांत आहे याची चर्चा करून सलोख्याने काम केले पाहिजे. संघांनी माहिती गोळा करणे, तिचा विचार करून निर्णय ठरविणे व ठरलेल्या निर्णयाप्रमाणे आचरण करणे या मागौनी कसे काम करावे हे एका स्वतंत्र प्रकरणांत सांगितलेच आहे. सुधारणेतील अत्यंत महत्त्वाचे अंग म्हणजे पैशांचा संग्रह करण्याची बुद्धि लोकांत उत्पन्न करणे. हा संग्रह म्हणजे सोने वगैरेंत नव्हे तर पेढ्यांत संग्रह करणे, व्यापारांत संग्रह करणे हा होय. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी कोणत्या तरी कारखान्यांत, कोणत्या तरी धंद्यांत कोणत्या तरी नादांत खर्च करण्यासाठी संग्रह केला पाहिजे अशी गोडी उत्पन्न केली पाहिजे. तसेच कर्जफेडीची 'व्यवस्था पाहिल्यावांचून कर्ज काढण्याची संवय मोडली पाहिजे. कर्ज फिटेल अगर कसे याचा मुळीच विचार न करतां व्यवहार करण्याची चाल फार धातु क आहे. त्याचप्रमाणे रोग, अपघात व मृत्यु यांसाठी विमा उतरण्याचा प्रघात पुष्कळ पडला पाहिजे. विमा उतरणाऱ्या मंडळ्या स्थानिक असाव्या म्हणजे त्यांच्या व्यवहाराची माहिती लोकांना जास्त होते. इंग्लंडमध्ये आजारी लोकांसाठी विम्याची योजना चांगली आहे. एक भाग मालकाकडून, एक भाग नोकराकडून व एक भाग धर्मादायांतून देऊन प्रत्येक गरीबाचा आजारीपणाचा विमा उतरलेला असतो. त्यामुळे लोकांचे हाल कमी होतात.FILE