पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामाजिक सुधारणा आहे, विधायक नाही. पाश्चात्यांच्या गोष्टी, कारण वगैरेची चौकशी न करतां स्वीकाराव्या पण हिंदी गोष्टी मात्र तशा स्वीकारूं नयेत असें प्रत्यक्ष अगर पर्यायाने सांगणार शिक्षण हिंदुस्थानांत प्रचलित आहे. हिंदी लोकांची एकी किंवा संघटना म्हटले की, सरकारचे धाबे दणाणते व एकमेकांनी एकमेकांना मदत करावी व सगळ्यांनी मिळून सहकार्याने कामें करावी असे शिक्षण देण्यांत येत नाही. यामुळे काम व ज्ञान यांची खरी गोडी शिक्षणामुळे लागत नाही. शिकलेल्या माणसाला कामाचा कंटाळा व ज्ञानाची अरुचि उत्पन्न झालेली दिसते. लोकांना आपले मन मोकळे करून सांगण्याची परवानगी नाही व यामुळे मनांत धुमसत असलेले विकार केव्हां केव्हां भडकून जातात, वाइटाबद्दल तिटकारा वाटणे साहजीक असून सुद्धां वाईट राज्यकारभाराचा द्वेष म्हणजे राजद्रोह समजला जातो. माणसांप्रमाणेच वर्तमानपत्रांना मन मोकळे करून बोलण्याची परवानगी नाही. यामुळे शिक्षण घेणाऱ्या तरुणांना राज्याची खरी स्थिति अनुभवास येते, पण बोलतां वगैरे येत नाही; हे पाहून ढोंग करण्याची संवय लागते. असत्य भाषण म्हणजे पाप ही भावना जाऊन असत्य भाषण व ढोंगीपणा म्हणजे शहाणपणा किंवा व्यवहारचातुर्य समजण्यांत येते. तरुणांचे लक्ष प्रत्यक्ष व्यवहाराकडे न लागतां काल्पनिक मनोराज्यांत गढून गेलेले असते व यामुळे त्यांची कर्तबगारी खुंटून मानसिक -हास मात्र होतो. याप्रमाणे सुंदर गुरुशिष्यसंबंघ, उत्तम जातिव्यवस्था, सर्वोत्कृष्ट व्यवहारपद्धति हिंदी समाजांत असून त्यांचा पुरस्कार करणा-या संस्था हिंदुस्थानांत नाहीत अशी स्थिति झाली आहे. - वर सांगितलेल्या सर्व सामाजिक सुधारणा करण्याचे काम विशेषतः तरुण स्त्री व पुरुष यांवर अवलंबून आहे. या कामांत कांही उत्तम संस्था काम करीत आहेत. परंतु त्यांत फारच थोडे लोक भाग घेत आहेत. या कामी आता सगळ्यांनी शिस्तवार, एकजुटीने, विचारपूर्वक हातभार लावला पाहिजे, कालेजांतून बाहेर पडलेल्या पदवीधरांत सामाजिक शिस्त दिसली पाहिजे व देशांतील पुढाऱ्यांनी त्यांना अधिकारयुक्त रीतीने योग्य बळण लावले पाहिजे, खेडेगांवांतून शेती व धंदेशिक्षण यांच्या सहाय्याने