पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८० भावी हिंदी स्वराज्य [प्र० ११ किंमत ओळखणे, संकेत बरोबर पाळणे, आचरणाचा विविक्षितपणा, लोकांशी मिळूनमिसळून व लोकांच्या उपयोगी पडण्याची वागणूक व समारंभांत, व्यवहारांत, चारचौघांत बोलण्याचालण्याची ढब या गोष्टी आपणांत येतील. परकी लोकांना आपल्याविषयीं पूज्य बुद्धि वाटेल व आपण परकीयांना भीत नाहीसे होऊ. समाजांत वागण्यासंबंधाचे आपण नियम ठरविले पाहिजे. आपल्या चांगल्या चाली ठेवून त्यांत नव्या चांगल्या चालींची भर घातली पाहिजे. सरळपणा, प्रामाणिकपणा व लोकांच्या उपयोगी पडण्याची संवय हे गुण आपण वाढविले पाहिजेत. नाही म्हणण्याला न कचरणे ही गोष्ट पहिल्याने शिकावयाला हवी. सांगितलेले मुकाट्याने ऐकावे अशी मुस्कुटदाबी, विचार करण्याची संवय लागल्यावर, चालणे शक्य नाही व ही चालवील असे कोणीहि समंजस माणूस म्हणणार नाही. युद्धांत एकतंत्री राज्यपद्धति हितप्रद व जास्त फलदायक होते व असा पुष्कळ काळ लोटल्यामुळे ही मुस्कुट दाबी प्रचारांत येते हे महायुद्धाने सगळ्या जगाच्या निदर्शनास आणले आहे. हिंदुस्थानांत देखील ही मुस्कुटदाबी अशीच जन्मास येऊन वाढली आहे, पण काळ बदलल्यामुळे तिचेहि रूपांतर करणे जरूर आहे. आईबापांनी मुलांना, गुरुजींनी शिष्यांना कारणे सांगितली पाहिजेत. कारणांची दिशा दाखवून तूंच विचार करून ती तपशीलवार शोधून काढून मला सांग असें आई, बाप, गुरु यांनी सांगण्यास हरकत नाही. जी गोष्ट मुलें अगर शिष्य यांची तीच गोष्ट बायकांची, हीन जातींची वगैरे होय. विचार करण्याची संवय लागून त्यांना त्या त्या गोष्टींच्या फायद्याबद्दल खात्री करून दिली पाहिजे म्हणजे कोणतीहि सर्वमान्य गोष्ट दुष्कर नाही. मात्र दोन्ही बाजूंनी समंजसपणे कामाला लागले पाहिजे. हिंदुस्थानांतील सामाजिक पद्धति धर्माच्या पायावर उभारलेली असून धर्म व व्यवहार हे अगदी एकजीव झालेले आहेत; पण कारणे सांगण्याची हिंदु धर्मशास्त्रकरांची पद्धत नसल्यामुळे व कारणांवांचून हिंदी पद्धत मान्य केली पाहिजे अशी सक्ती नाहीशी झाल्यामुळे हल्ली सर्वत्र बखेडा झाला आहे. हिंदुस्थानांतील लोकसंख्येची वाढ व हवापाणी देखील या बखेड्याला अनुकूल "अशी आहे. हल्लींची शिक्षणपद्धति विध्वंसक.