पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.] . सामाजिक सुधारणा १७९ केल्या त्याच खऱ्या सुधारणा. दारूबाज व व्यसनी मनुष्य भंग्याबरोबर दास पितो व शेतखान्याच्या पाण्यांत लोळतो किंवा रंडीबाज व्यसनी महारणीशी उकिरड्यांत रत होतो म्हणजे काही सुधारणा नव्हे. स्वच्छ पाणी व स्वच्छ भाकरी कोणाहि स्वच्छ माणसाने केलेली कोणच्याही स्वच्छ ठिकाणी, कोणाच्याही समक्ष खाण्यास हरकत नाही असा जेव्हां रिवाज पडेल तेव्हां ती खरी सुधारणा म्हणता येईल. तोपर्यंत हे सर्व ढंग आहेत व अशी सुधारणा होण्यासाठी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करण्याची संवय लागली पाहिजे. जी गोष्ट विचाराला पटली ती आचरणांत आली अशी संवय लागली म्हणजे मनुष्य 'बोले तैसा चाले' असा होतो व हीच खरी सुधारणा. हिंदुस्थानची जर खरी उन्नति झपाट्याने व्हावयाला पाहिजे असेल तर रोटी बेटी व्यवहाराला त्यांनी नसते महत्त्व देता कामा नये. एका ताटांत जेवणारे भाऊ भाऊ जर एकमेकांस पाण्यांत पहात असले, मुली दिल्या घेतल्या असे व्याही जर एकमेकांचा द्वेष करीत असले, तर त्या रोटीबेटीव्यवहारांत काय अर्थ आहे ? हे जाणून एकमेकांवर प्रेम करावे, हा माझा म्हणून जीव तिळतिळ तुटावा यांत सर्व येते. खरी स्वच्छता, शुद्धि कशांत आहे, तिचे तत्व काय, हे पाहून त्याप्रमाणे बुद्धि पुरःसर व निर्भयपणे आचारण करण्यास लोकांस शिकावले पाहिजे. परदेशी जाण्यापूर्वी त्या देशांतील रीतीरिवाज यांची माहिती व अभ्यास अवश्य केला पाहिजे. त्या परदेशांत आपल्या व्यवस्थेच्या खाणावळी व वसतिगृहें काढली पाहिजेत. परदेशांतून माणसे आली म्हणजे त्यांना भेटून तेथील चालीरीती, कामधंदे करण्याच्या पद्धति, सुखसोई, व्यापाराच्या योजना कुटुंब, संघव्यवस्था याबद्दलची माहिती प्रत्येकाने विचारून संपादन केली पाहिजे. परदेशांशी व्यापारउदीम, शिक्षणसंघट्टन व अनेक प्रकारचे व्यवहार हिंदी लोक समक्ष करू लागल्यावांचून हिंदुस्थानची सुधारणा होणे नाही. याबाबद आपण हल्ली केवळ परक्या कंपन्या व अडत्ये यांवर अवलंबून आहोत ही मोठी चूक आहे. असा आपला परदेशांशी प्रत्यक्ष व्यवहार वाढला म्हणजे वक्तशीर व व्यवस्थित कामे करण्याची संवय, वेळेची.