पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र. १ हातापायांसारखे मोठे अवयव व त्यांच्या मदतीस लहान मोठी यंत्रे वापरावयाची असतात. या कामाला जास्त शक्ति लागते व या प्रचंड शक्तीचा जर चुकून दुरुपयोग झाला तर मोठे अनर्थ गुदरतील; म्हणून आचाराला सगळ्यांत स्वातंत्र्य कमी, जितकी जास्त शक्ति वापरावयाची असेल तितकें तिला नियंत्रण जास्त पाहिजे. सायकलचे ब्रेक लहानसे, मोटारीला ब्रेक असून शिवाय शंख व आगगाडीने परवानगीशिवाय हलावयाचें नाहीं अशी मोठ्या शक्तीला जशी जास्त नियंत्रणें यांत्रिक कामांत असतात तशीच ती विचार, उच्चार व आचार यांतहि पाहिजेत. - कोणत्याहि संघाच्या कार्यक्रमांत हजारों कामें येतील. पण त्यांपैकी महत्त्वाची व जरूरीची कोणती हे ठरविण्याचे काम विचारी माणसाचे असते व यासाठी संघस्थापनेत यांना आग्रस्थान मिळून पहिल्याने कामास सुरुवात करणारी माणसें ही असावी. या विचारी माणसांनी फार सावधपणा व चातुर्य वापरावे लागते. कारण विषय अनेक प्रकारचे व गुंतागुंतीचे असतात. त्यांची गुंतागुंत सोडवून, एक एक धागा घेऊन, तो आपल्या इष्ट मार्गाकडे जातो अशी खात्री करून घेऊन, मग त्यांतील गुण दोषांची पारख करून, त्यांत सुधारणा करून, त्याचा स्वीकार करावयाचा असतो. यासाठी ज्यांना गुंतागुंतीच्या प्रश्नांचा विचार करण्याची संवयं आहे. अशी शास्त्रपारंगतच माणसें या कामाला पाहिजेत. यानी शास्त्रे, ग्रंथ, स्वदेश, परदेश वगैरे सर्व पाहून त्या बाबीचा निर्णय केला पाहिजे. आपणाला आज येत असलेल्या अडचणी पूर्वी कोणास कधी आल्या काय किंवा हल्ली दुसऱ्या कोठे येत आहेत काय व या अडचणींचे निरसन या लोकांनी कसे केले, याबाबद त्यांच्या व आपल्या परिस्थितीमुळे काय फरक पडतो, त्यांना सोई व अडचणी कोणत्या व आपणांस सोई व अडचणी कोणत्या, कोणती चूक झाल्याने काय झाले व झाली तर काय होईल हैं सर्व नीट पाहून यांनी कामाचा निश्चय केला पाहिजे, लोकांनी घेतलेला अनुभव जितक्या थोड्या किंमतींत आपणास उपयोगी पडेल तितक्या किंमतीस तो घेऊन वापरला पाहिजे. शहाणा माणूस व वेडा माणूस यांत अंतर पडते ते येथेच. वेडा इसम प्रत्येक बाबीचा स्वतः अनुभव घेत असतो, पण शहाणा लोकांच्या अनुभवाने आपण सावधगिरी ठेवीत असतो व