पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० ११ एक प्रकारे महत्त्व व संघटित स्वरूप येईल व इतर जातींना त्यांचा वाटणारा तिरस्कार आपोआप कमी होत जाईल. विद्या, धंदे व संपत्ति वाढली म्हणजे त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार देखील वाढतील व मग सभा, परिषदा, सोसायट्या, कमेट्या यांत ते काम करू लागले म्हणजे त्यांच्या वागणुकीत वगैरे योग्य फेरफार होऊन त्यांची उन्नति होईल, का. वरील विचार वाचून पुराणमताभिमानी लोकांना एक प्रकारे ' अब्रम्हण्य ' वाटेल. त्याचप्रमाणे समाजसुधारकांची आजपर्यंत काय चूक होत होती हे त्यांना दिसेल हे जाणूनच योग्य ते विचार निर्भीडपणे प्रगट केले आहेत. कोणतेहि विचार केवळ नवीन म्हणून त्याज्य मानूं नयेत इतकाच इषारा येथे द्यावा असे वाटते. समाजाचे प्रत्येक घटकांत निर्भयता उत्पन्न होणे जरूर आहे. फक्त पाप व परमेश्वर यांचे भय पाहिजे. आपण आजपर्यंत आपणाला संपूर्ण समजून जगाची पर्वा करीत नव्हता. पण ही स्थिति दिवसेंदिवस राहणार नाही. यासाठी जगाला दूर ठेवण्याऐवजी आपण त्याच्याबरोबर चाललं पाहिजे, चांगले दिसेल ते घेऊन त्याचा आपल्या जुन्याशी एकजीव करण्याची आपली पूर्वपरंपराच आहे. संध्येसारख्या अगदी लहान व नियाच्या गोष्टीपासून तो थेट वेदांताच्या उच्चतम शिखरापर्यंत नव्याजुन्याचा मेळ ठेवून सुधारणा करण्याची आपली हिंदु लोकांची प्रवृत्ति स्पष्ट दिसेल. आज दीडहजार वर्षे ही प्रवृत्ति सुटली आहे ती आपणांस फिरून रूढ केली पाहिजे. पाश्चात्यांच्या नव्या समाजांत नवे शोध, नवे अनुभव व नव्या सोई दिसतात. त्यांपैकी चांगला भाग घेऊन आपण आपली सुधारणा करण्याचे धोरण ठेवले पाहिजे म्हणजेच आपली खरी व टिकाऊ सुधारणा होईल.सुधारकची लटपटीत रीत, दिखाऊ भपका व भीत भीत केलेली योजना उपयोगी नाही. योग्य ती गोष्ट आपण निर्भयपणे व मोकळ्या मनाने करण्यांत कसूर करूं नये, - हल्ली जातिधर्माचे बंड बरेच कमी झाले आहे पण ते शास्त्र शुद्ध किंवा जाणून बुजून केलेले नाही. औषधे नाइलाज म्हणून, बर्फ, चहा, सोडा व्यसने म्हणून, पाव, बिस्किटें चैन म्हणून लोक खातात; पण याच लोकांना साधे पिण्याचे पाणी किंवा भाकरी पोळी चालत नाही अशी स्थिति आहे. ही स्थिति मोडून पद्धतशीर व विचारपूर्वक ज्या गोष्टी