पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.] सामाजिक सुधारणा बायकांच्या स्थितीसंबंधाने देखील हिंदुस्थानांत पुनर्घटना होणे जरूर आहे. लोकसंख्येपैकी निम्या लोकांनी केवळ गृहकृत्याशिवाय कांहीं करूं नये हे उचित नाही. धंदे वाढले म्हणजे ही स्थिति साहजिकच सुधारेल, घरच्या धंद्यांत बायकापोरांची मदत होईलच, बायकांनी आपले गृहकृत्य करून मिळविलेले पैसे त्यांच्याच मालकीचे व्हावे असा लोकमताचा ओघ झाला तर पुष्कळ कार्य होईल, शिंपी, पटवेकरी, वगैरे जातीत हल्लीच असा प्रकार आहे व घरगुती धंद्यांची जितकी वाढ होईल तितकी ही स्थिति सार्वत्रिक होणार आहे. घरोघर किंवा पांच चार घरांत चालवितां येतील असे धंदे बायकापोरांना शिकविले पाहिजेत व त्यांची होईल तितकी वाढ केली पाहिजे. तात्पर्य, एकट्या पुरुषांच्याच श्रमांवर सगळ्या कुटुंबाचा भार पडणे जरा घातक आहे. वाटेल तितकें शिक्षण घेऊन स्वतंत्रपणे पोट भरण्याची किंवा धंदे चालविण्याची स्त्रियांना मुभा असावी व त्यांस वावहि द्यावा. केवळ बायकांनींच चालविलेले कारखाने अगर धंदे असावे. मात्र स्त्रीपुरुषांची अनियंत्रित मिसळ जी पाश्चात्य देशांत अनीतिवर्धक व स्त्री पुरुषांत स्पर्धा उत्पन्न करणारी झाली आहे तसे न होण्याची आपण खबरदारी घ्यावी. - याचप्रमाणे अस्पृश्य लोकांत देखील शिक्षण, धंदे व संपत्ति यांचा प्रसार करून त्यांचे वर्तन सुधारेल व ते स्पर्शार्हच नव्हेत तर समाजांत मिसळण्यास योग्य होतील असा प्रयत्न झाला पाहिजे, त्यांनी आपल्या योग्य धंदा, पिढीजाद धंदा, करून स्नान वगैरे करून समाजांत यावे म्हणजे झाले. गिरणीत कोळसा घालणारे वगैरे कामकरी लोकांसारखी महार, भंगी वगैरेंनी वागणूक ठेवावी म्हणजे त्यास समाजांत मिसळतां येईल. तेली, लोहार, भडबुजे देखील आपले काम झाल्यावर स्वच्छ स्नान करून स्वच्छ पोषाख करून समाजांत मिसळतात. पिढीजाद धंदे करण्याची चाल मात्र आपण सोडूं नये. कारण समाजाला ही मोठी हितकारक आहे. हलक्या समजल्या जाणाऱ्या जातीनी व्यसनाना आळा घालून संपत्तीचा संचय करण्यास शिकावे. असा संचय त्यांच्या जवळ झाला, त्यांचे धंदे करण्याचे काम कंत्राटाने, संघानें, कंपन्या काढून होऊ लागले तर त्यांची प्रतिष्ठा वाढेल. त्यांना भा...हिं...स्व...१२