पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० ११ देशांत सुद्धा याबाबद पुष्कळ मतांतर झाले आहे. मुलींच्या पाश्चात्य देशांतील लग्नाचे वय अठरावरून बारापर्यंत आले आहे व लहानपर्णी झालेल्या लग्नांत घटस्फोटाचे प्रसंग कमी येतात असा त्यांचा अनुभव आहे. ही गोष्ट खालील कोष्टकावरून कळेल.. . मुलाचे लग्नांची वय संख्या १५ १६०० ८२ १२ १६ ३२२२१४४१३ १७ ७६९९ २६६, १४ । १८ २४९४४ ७७० १५ १२३८४४९९ १९ ५८९०९ १३१७ १६ ४१६२६ १२६८ २. . आपण १७ ९०९३० २७९२ घटस्फोट मुलींचे लग्नांची वय संख्या घटस्फोट हे आंकडे संयुक्त संस्थानांच्या १९२१ सालच्या खानेसुमारीतून घेतले आहेत व यावरून लवकर लग्ने हितकर असे पाश्चात्य देशांत ठरत आहे.. लहानपणी लग्ने करण्याची चाल बंद झाली तर बालविधवांची संख्या कमी होईल हे उघड आहे. पण अविभक्त कुटुंबांत सुखाने राहण्यासाठी जों लहानपणापासूनचा लळा पाहिजे तो नाहीसा होईल. पाश्चात्यांची विभक्त कुटुंबपद्धति हिंदुस्थानाला घेण्यासारखी नाही. या विभक्त कुटुंबपद्धतीने देशांत नसते ढंग व खर्च वाढतात व बंधुप्रेम कमी होते. न्याय व दूरदीपणा यांच्या दृष्टीने पाहिले म्हणजे कोणालाहि तूं घुनर्विवाह अगर विवाह कर किंवा करूं नको म्हणणे गैर आहे; पण समाजाचे स्थैर्य व सुस्थिति यांच्या दृष्टीने याबाबद काहीतरी निबघ असणे जरूर आहे. हे निबंध पुष्कळसे लोकमताचे व थोडे कायद्याचे असावे. नवराबायकोत पांच वर्षांपेक्षा कमी व वीस वर्षांपेक्षा जास्त अंतर असूं नये असा कायद्याने निबंध घालावा व ज्यांना दहा वर्षे स्त्रीपुरुषसुख किंवा चार मुले झाले त्यांनी पुनर्विवाह करूं नये असा लोकांमताचा निबंध पाहिजे. धर्माने तर कोणाहि स्त्रीने अगर पुरुषाने पुनर्विवाह करूं नये असा रोख ठेवावा.