पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामाजिक सुधारणा . (६) योग्य शिक्षणाने योग्य वळण लावता येईल. पण लोकांत तेज व का आत्मविश्वास उत्पन्न न होऊ देण्यासाठीच निर्माण केलेल्या शिक्षणाने में काम व्हावें तेच झाले आहे. कांहींच करण्याची धमक नाहीशी केल्याने सामाजिक सुधारणा देखील करतां आल्या नाहीत. (७) हिंदु समाजांतील पुष्कळ दोष जातिबंधनामुळेच आले आहेत व यासाठी अगोदर जातिबंधने योग्य प्रकारे ढिली केली पाहिजेत. कायद्याशिवाय दुसरें बंधनच न मानण्याची लोकांना संवय झाली आहे व त्यासाठी काही दिवस या सुधारणा कायद्यानेच करावयाला पाहिजेत. (८) कायद्यानेच या गोष्टी तूर्त केल्या पाहिजेत हे खरे, पण यासाठी निव्वळ कायद्यावरच अवलंबून रहाणे चांगले नव्हे. लोकांत योग्य प्रकारची जागृति करून चांगले वाईट काय याची जाणीव त्यांच्या मनांत दृढ केली पाहिजे म्हणजे कायदा व लोकमत यांची योग्य सांगड होईल व मग हे काम उत्तम होईल. : सामाजिक सुधारणा करण्याचा थोडा फार प्रयत्न होऊन त्यापासून योग्य उपयोग झालेला दिसत नाही याची कारणे वरप्रमाणे आहेत. ही कारणे अंशतः तरी पहिल्याने काढली पाहिजेत व यासाठी पहिल्याने चांगल्या गोष्टी सक्तीने व कायद्याने तसेच लोकमत जागृत करून घुढान्यांनी केल्या पाहिजेत. यासाठी संघ, व्याख्याने वगैरे सर्व साधनांचा उपयोग केला पाहिजे. जागा - सुशिक्षित. माणसें जर स्त्रीपुरुष संबंधांत योग्य निबंध पाळणार नाहीत तर कायदे तरी काय करू शकतील १ यासाठी सोळा वर्षांची मुलगी ष बावीस वर्षांचा मुलगा यापेक्षा लहानांचा गांधान संस्कार किंवा स्त्रीपुरुष संयोग होऊ नये याबद्दल वडील माणसांनी खबरदारी घेतली पाहिजे, यांत चोरून मारून किंवा चूक झाली तर ती इतकी थोडी होईल की, त्यापासून अपाय होणार नाही. मुलींची किंवा मुलांची लग्ने लवकरच व्हावी व तशी ती होण्यांत कोणताहि दोष नाही. पाश्चात्य