पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ भावी हिंदी स्वराज्य [प्र० ११ . वर सांगितलेल्या सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न आज पुष्कळ -वर्षे हिंदुस्थानांत चालू आहे. परंतु त्यास यावी तशी फळं आली नाहीत याची कारणे- (१) लोक अत्यंत अज्ञान व अव्यवस्थित आहेत. चांगले व वाईट कोणते याची निवड त्यांना स्वतःला करता येत नाही व सांगणारे । लोक वकीलाप्रमाणे एकपक्षी गोष्टी सांगतात. (२) सरकार हिंदी लोकांचे नाही यामुळे सामाजिक बाबींत ते बेदर कार आहे. शिवाय परकी लोकांना त्यांच्या स्वतःच्या चाली चांगल्या वाटल्यामुळे जनतेने तिकडे जावे असे त्यांना वाटते व त्या धोरणाने त्यांचे प्रयत्न न कळत सुद्धा होतात. (३) शिक्षणखात्याने योग्य शिक्षण देण्याची व्यवस्था केली नाही व . त्यामुळे मुलामुलीनां योग्य वळण, योग्य विचार करण्याची संवय व योग्य आचरणाची शिस्त लागली नाही. खऱ्या रस्त्याने जावयाच्या ऐवजी दरएक मोठा मनुष्य आपल्याच मताकडे व वर्तनानुरूप जनतेला वळण लावण्यास पहात आला आहे. (४) सरकारची शांतता ठेवण्याकडे कठोर नजर असल्याने जनतेला , अप्रिय व खरोखर देशाला घातुक अशा गोष्टी देखील लोकांना Sai मुकाट्याने उघड्या डोळ्यांनी व मन शांत ठेवून पहाव्या लाग तात. याप्रमाणे मन लोचटः व पोचट झाल्याने चांगल्या गोष्टी तशाच शांतपणे ऐकण्यात व पाहण्यांत येतात. दोहोंचा योग्य - परिणाम मनावर न झाल्याने जनता ही सुकाणूं नसलेल्या बोटी प्रमाणे अव्यवस्थितपणे हेलकावे खात आहे. (५) कोणतीहि सामाजिक सुधारणा लोकांच्या मनांत तेज व तिर स्कार उत्पन्न केल्याशिवाय होत नाही. निग्रहाने वागण्याची संवय लोकांत असल्याशिवाय भाषणे वगैरेंचा परिणाम आचरणांत म होत नाही. ही निग्रहशक्ति तर इंग्रज सरकारनी पहिल्याने नष्ट करून टाकली, मग लोकांच्या आचरणावर परिणाम होत नाही याबद्दल रडण्यांत काय अर्थ ?