पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वे. सामाजिक सुधारणा देशोदेशीचे रिवाज शिकवावे, परदेशी लोकांच्या ओळखीपाळखी करून द्याव्या, त्यांचा नीट जम बसवून द्यावा, ही कामे करावी. हिंदुस्थानांत कारखान्यांची व व्यापाराची योग्य वाढ होण्याला या गोष्टी अवश्य आहेत व या वाढीबरोबर अडते व खाणावळी यांची वाढ साहजीक होणार आहे. ___शिक्षणांत अगोदर हिंदुस्थान मागे व त्यांत स्त्रीवर्ग फार मागे आहे. त्यांना योग्य लिहिणे वाचणे व त्याबरोबर योग्य पुस्तके व धंदे यांची वाढ केली पाहिजे. लिहिणे वाचणे शिकावयाचें तें नाटके, कादंबऱ्या वाचण्यासाठी नव्हे तर उपयुक्त ज्ञान संपादनासाठी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून लिहिण्यावाचण्याच्या प्रसाराबरोबर योग्य पुस्तकांचा प्रसार झाला पाहिजे. जे पुस्तक अनेकदां वाचले तरी फिरून वाचावे असे वाटेल ते, जे आपली रहाणी व मिळकत सुधारील ते, जे आपले आचरण व परमेश्वरी भक्तीकडील ओढा सुधारील ते चांगले पुस्तक, व अशी पुस्तकें योग्य बक्षिसें लावून तयार करविली पाहिजेत व योग्य माणसांकडून परीक्षा करवून त्यांचा प्रसार होईल असे केले पाहिजे. बायकांच्या सुधारणेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पडदा. पडदा असणे, फार पडदा असणे, दहा जणांत येऊन बसण्या बोलण्याची मनाई किंवा लाज असणे हे वाईट आहे. त्याचप्रमाणे मुळीच आडपडदा नसणे, पुरुषांशी स्पर्धा करणे, विनय व मर्यादा सोडून देणे, खिचडीप्रमाणे किंवा पत्त्याप्रमाणे स्त्रीपुरुषांची हवी तशी मिसळ असणे देखील वाईट होय. योग्य मर्यादेनें स्त्रीपुरुषांना एकमेकांशी मोकळेपणे वागता यावे अशी व्यवस्था पाहिजे. योग्य शिक्षणाने ही गोष्ट सुलभ आहे. या बाबतीत स्त्रियांना शिक्षण पाहिजे, तसेंच पुरुषांनाहि पाहिजे, दोघांनीहि आपले आचरण शुद्ध व सरळ ठेवले पाहिजे असा निबंध पाहिजे. अमर्याद वर्तन करणारा पुरुष दंड्य समजला पाहिजे व त्याचप्रमाणे स्त्री देखील दंड्य समजली पाहिजे. स्त्रियांनी पुरुषांचे मन चंचळ होऊन लालचावेल असे वर्तन करूं नये; त्याचप्रमाणे पुरुषांनी स्त्रियांकडे फार नजर लाऊन आपले मन उल्लू करूं नये ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. उत्सव वगैरे प्रसंगी योग्य मर्यादेनें स्त्रीपुरुषांनी एकत्र यावे, भाषणे करावी, विचारविनिमय करावा अशी योजना करून त्यांना योग्य वळण लावले पाहिजे. या