पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ _भावी हिंदी स्वराज्य [प्र० ११ आहे, लोकांना पोटभर अन्नवस्त्र मिळत नाही हे खरे. तरी हिंदुस्थानची लोकसंख्या फार झपाट्याने वाढत आहे व तिला आळा घालण्यासाठी अमुक वर्षांच्या वयावर पुनर्विवाह करूं नये, असा निबंध करणे अवश्य आहे. मा विवाहासंबंधी या सुधारणाबरोबर परदेशी जाण्याबद्दल असलेले निबंध रद्द केले पाहिजेत. प्राचीन काळी सर्व जगभर ज्यांनी साम्राज्ये स्थापून घुडगूस घातला त्याच आर्य लोकांच्या वंशजांनी आतां परदेशगमन निषिद्ध मानावे हे मोठे चमत्कारिक दिसते. आपण सुधारलेले व पूर्ण, आणि जग सगळे अडाणी व त्यापासून आपणांस शिकण्यासारखे काही नाही अशा स्थितीत कोणी हे निबंध घातले असतील; पण आज ती स्थिति अगदी पालटली आहे, तेव्हां त्याप्रमाणे हे नियमहि पालटले पाहिजेत. यासाठी प्रवासांत आपणांस योग्य त्या सवलती मिळतील अशी तजवीज हिंदुस्थानाने केली पाहिजे. उदाहरणार्थ, आगबोटी व परमुलुखाची बंदरें व मोठी शहरें येथें फक्त हिंदी व्यवस्थेचे शाकाहारी असे भोजनवसतिगृह काढले पाहिजे. या भोजनवसतिगृहांची सर्वत्र फार अवश्यकता असून अशा शाकाहारी भोजनगृहांत परदेशी लोकांचे मोठे गि-हाईक येईल. परदेशच्या प्रवासाची मोकळीक व ही सोय अशा दोन गोष्टी झाल्या म्हणजे हिंदी लोकांना जगभर सुखाने प्रवास करता येईल, हल्ली हिंदुस्थानांतून परदेशी जाणाऱ्या लोकांत पुष्कळ मजूरच असतात. अशा मजुरांचे संघ करून त्यांच्या सुखसोईची व्यवस्था काणारी मंडळ स्थापन झाली पाहिजेत, हे लोक कोठे जातात, यांजजवळ कोणती साधने आहेत व कोणत्या साधनांची यांना उणीव आहे हे पाहून ती साधनें त्यांना उपलब्ध करून देणे, परदेशी यांची योग्य सोय लावणे, यांना लागेल ती मदत करणे हे परदेशी हायकमीशनरांचे एक अवश्य कर्तव्य समजले पाहिजे. परदेशच्या चालीरिती, त्यांचे व्यवहार व व्यवहाराचे तत्व ही हिंदुस्थानांतील जनतेस समजतील असे प्रयत्न आपण केले पाहिजेत, परदेशी जाणाऱ्या लोकांची सोय व व्यवस्था करून देणारे मंडळ मुंबई, मद्रास, कराची, कलकत्ता यासारख्या दरएक बंदरी पाहिजे व त्या मंडळाचे अडत्ये जगभर पाहिजेत, त्या अडत्यांनी हिंदी लोकांना