पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामाजिक सुधारणा हल्ली इतकी घट्ट झाली आहेत की, ती पाळण्यांत आयुष्याचा पुष्कळ भाग खर्च होतो. त्या बंधनांतील मुख्य तत्व किंवा रहस्य सुटल्याने ती बंधने म्हणजे एक ढोंग झाले आहे. या ढोंगामुळे आपली कुचंबणा होऊन वाढ खुंटत आहे. यासाठी यांत किती मोकळेपणा देतां येईल याचा विचार नव्या स्वराज्यांत अवश्य झाला पाहिजे... हल्ली वागण्याचे नियम इतके शिथिल झाले आहेत की, प्रत्येक इसम म्हणजे एक एक पोटजात झाली आहे. अशा स्थितीत पोटजाती मोडून जातींत सर्वत्र रोटीबेटी व्यवहार सर्वदा सुरू केला पाहिजे. कित्येक वेळां तर मुलाच्या जन्मापासून आपल्या जातींत मुलगी जन्माला यावी म्हणून नवस करता करतां त्याच्या लग्नाच्या वेळीच मुलगी नुकती जन्म पावावी असा प्रसंग येतांना पाहण्यांत आहे व अशा रीतीने म्हतारा पुरुष व तरुण पोरगी यांची लग्ने लावण्याचा प्रसंग आला आहे. तसेच उलट बहिणःभावंडांतच लग्ने करण्याचे प्रसंग आलेले आहेत. ही आपत्ति टळावी म्हणून पोटजाती मोडणे कायदेशीर झाले पाहिजे. तसेंच हुंडा घेणे व गांवजेवण घालणे कायद्याने बंद केले पाहिजे. या चालीमुळे पुष्कळ घरे धुळीस मिळतात व ही चाल वाईट असे सर्व लोक म्हणतात. पण ती स्वार्थामुळे त्यांना मोडवत नाही. कित्येक जातीत गर्भाधानाचा निर्बध नाही, तो घातला पाहिजे. नुसते लग्न झाले म्हणजे कोणताहि मुलगा अगर मुलगी स्त्रीपुरुष संबंधाला योग्य झाली असे नाही. त्यांचे रीतसर गर्भाधान योग्य वयांतच झाले पाहिजे व यासाठी हा निबंध कायद्याने घातला पाहिजे. पूर्वी पंचांना-जाती पंचांना-असले निर्बंध घालतां येत असत. पण हल्ली पंचांना मान नसल्याने या गोष्टी कायद्याने करणे जरूर झाले आहे. या कित्येक जातीत पुनर्विवाह करूं नये असा निबंध आहे. याबाबद लोकमत बदलत आहे व त्याला अनुसरून योग्य परिस्थितीत पुनर्विवाह करण्याची मोकळीक देणे योग्य आहे. त्याचप्रमाणे कित्येक जातींत व परिस्थितीत पुनर्विवाहाची मनाई केली पाहिजे. पुनर्विवाह हा बायकांचाच नव्हे तर पुरुषांचा सुद्धा कायद्याने मुक्त किंवा निषिद्ध असा दोन्ही प्रकारचा पाहिजे. या बाबींत मर्यादा असणे जरूर आहे. घुष्कळ विधवा वगैरे अविवाहित रहातात, लहान पोरांची मृत्युसंख्या मोठी