पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र. ११ पाहिजे. या दोघांत चामड्यांच्या रंगाशिवाय काही अंतर नाही हे सर्वांना ठाऊक आहे, तर त्याप्रमाणे त्यांनी वागावयाला पाहिजे. ज्या निबंधांतील विशिष्टत्व गेलें तो निबंध ठेवण्यांत अर्थ नाही, हे ओळखून आपण खिस्ती लोकाइतकी मोकळीक महार मांग वगैरेंना दिली पाहिजे. इतकेच नव्हे तर खिस्ती लोकांपेक्षा त्यांना जास्त मोकळीक द्यावयाला पाहिजे.. ज. सर्व लोकांप्रमाणे या लोकांना रीतभात, स्वच्छता, धंदा, व्यवहार हा आपण लावला पाहिजे. त्यांना लिहिणे वाचणे शिकवून उच्च जातींबरोबर वागणूक वगैरे सुधारण्यास मदत केली पाहिजे. आतां. हे लोक पूर्वीप्रमाणे समाजाचे निबंध पाळण्यास नाखूष नाहीत, ते समाजाचा घात करणारे नाहीत, ते समाजांत मिसळं इच्छितात तर त्यांना तसे करू द्यावे.. आपली संस्कृति, आपले रक्त, आपला समाज नीट ठेवण्यासाठी या लोकांना बाहेर वाळीत टाकले होते व तो हेतु कायम ठेवूनहि आज आपणास त्यांस पुष्कळ सवलती देता येतील. बहिष्कृत, अंत्यज, पंचम हे शब्दच त्यांची रचना व स्थिति दाखविणारे आहेत. चार वर्णाबाहेरील सरहद्दीवरील चारी वर्णीचा चोथा किंवा गाळ असे हे लोक होत. यांना शिक्षा म्हणून वाईट धंदे सांगण्यांत आले व आनुवंशिक संस्कारांचे जोरावर हे धंदे याच लोकांकडे निर्धास्तपणे राहिले व हे धंदे किंवा यांची घाण सर्वत्र पसरणे धास्तीदायक वाटल्याने यांस अस्पृश्यत्व आले. दारू पिण वाईट असे ठरल्यावर दारूचा धंदा करणारे कलाल देखील असेच अस्पृश्य ठरले. धोबी, न्हावी सर्व प्रकारची घाण धुतात म्हणून त्यानाहि थाड अस्पृश्यत्व आले आहे. याप्रमाणे अस्पृश्यत्व शास्त्रशुद्ध व वाजवा आहे; पण आपण गोऱ्या किंवा खिस्ती लोकांशी ते पाळीत नाही तेव्हा याहि लोकांशी ते सोडण्यास हरकत नाही, असा वादाचा मुद्दा आहे. कांहींहि कारण असले तरी खिस्ती लोकांशी तुलना करतां हे जातिनिबंध थट्टास्पद झाले आहेत. स्वैरवर्तनप्रिय पाश्चात्यांच्या संसर्गाने पूर्वाचा बंधनें दुःसह वाटतात व नवीन संघांची बंधनें अद्याप रूढ झाली नाहीत अशा स्थितीत आपण आहोत व अगदीच बधन तोडण्यास प्रवृत्त होण्यापेक्षा ती थोडी ढिली करून समाज विस्कळीत होऊ न देतां जूट कायम ठेवण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. ही बंधने