पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामाजिक सुधारणा साधने आहेत व देश, काल, परिस्थति यांना अनुसरून ही साधनें बदलली पाहिजेत. ही जाणीव ठेवून साध्याकडे लक्ष देऊन आपण वागले पाहिजे. हिंदुस्थानांतील जातिभेदांसंबंधाने अस्पृश्य मानलेल्या जातींनाच जास्त चिडविण्यांत येते. त्यांना इतर लोक 'अस्पृश्य', तुम्हांला कोणी शिवतसुद्धां नाहीत असे चिडवितात. इतर देशांतील लोक म्हणजे सगळे सगळ्यांच्या नेहमी गळां पडतात असे नाही. पण त्यांना शिवण्याची परवानगी आहे, निदान शिवू नको असे कोणी म्हणत नाही इतकेंच, आपल्या शरीरांतसुद्धा काही भाग अस्पृश्य, गुह्य, अदर्शनीय असे असतात व तसें असणे -साहजिक आहे. आपल्या समाजास अपायकारक असा भाग असा असतो. अस्पृश्य लोक हे आपल्यापैकीच असून समाजाला अपाय करणारे, सामाजिक बंधने न पाळणारे म्हणून शिक्षा म्हणून यांना बहिष्कार घातला व शिक्षा म्हणून घाणेरी किंवा हलकी कामें त्यांस करण्यास लावले. पुढे ते लोक तीच कामें करीत राहिल्याने त्यांना समाजापासून अलग ठेवणे योग्यच होते व यामुळे समाजांत एका प्रकारची स्वच्छतेची मर्यादा राहिली आहे. सगळ्या जगांत ज्यांना स्वच्छतेची मर्यादा नाही असे लोक म्हणजे ख्रिस्ती लोक होत, इतर सर्व लोक परमेश्वरी पूजा वगैरे करण्यापूर्वी अमुक स्वच्छता पाहिजे, श्रेष्ठपणासाठी अमुक स्वच्छता पाहिजे, अमुक स्वच्छता असेल तोच उच्च असे मानतात. पण सर्व जगांत गलिच्छ लोक, -गलिच्छपणा वाटेल तेथे चालतो असे लोक, गलिच्छ लोकांना पण कनिष्ठ मानण्यांत येत नाही असे लोक म्हणजे खिस्ती होत व हे खिस्ती लोक आपल्या अस्पृश्य लोकांना फार चिडवितात, मुळी नाकच नसणाऱ्या माणसाने शेंबूड येण्याबद्दल नाक असणाराला हंसावें अशांतला हा प्रकार आहे. ज्याप्रमाणे लहान मुलांना चिडवून घरांत भांडणे लावण्यांत येतात किंवा घरांतील गुप्त गोष्ट काढून घेण्यांत येते त्याप्रमाणे हा प्रयत्न आहे. आपण या अज्ञान लोकांना समजत नाही यासाठी आपले नियम जरा बदलले पाहिजेत. अत्यंत गलिच्छ, धर्मानेंच गलिच्छ, नियमितपणे किंवा हटकून गलिच्छ, शौच पाळलेच पाहिजे असा ज्यांच्यांत निबंध नाही, ज्यांना xx तोंड धुतल्याशिवाय जन्मभर रहातां येते व सर्व कर्मे करता येतात पशा पाश्चात्य लोकांइतकी मोकळीक आपल्या अस्पृश्य वर्गाला दिली