पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संघस्थापना होतो. हा विचार करतांना सर्व मंडळीची मदत संघाने घ्यावी. विचार करतांना असे आढळून येते की, काही बाबींत सर्व किंवा पुष्कळ मंडळींची एकवाक्यता आहे व इतर काही बाबींत थोडा फार मतभेद आहे, मग ज्या बाबतींत एकवाक्यता आहे त्या बाबींचे ठराव करून एकमताने अमलबजावणीस सुरवात करावी व ज्यांत थोडा मतभेद आहे त्यांत धरसोड करून तडजोड करता येईल तर पहावें व इतर बाबी तात्पुरत्या सोडून द्याव्या. अमलबजावणीस सुखात झाली म्हणजे कित्येक तपशील जितके सोपे वाटले होते तितके नाहीत असे अनुभवास येते, ज्या गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या त्या येतात व या अनुभवाने आपल्या कामांत फेरफार करावे लागतात. याप्रमाणे संघाच्या कामाच्या (१) माहिती गोळा करणे, (२) चर्चा करून निर्णय ठरविणे, (३) ठरलेल्या निर्णयाप्रमाणे वागणे व (४) अनुभवाने निर्णयांत फेरफार करून ते अंमलांत ठेवणे अशा चार पायऱ्या पडतात. या चारी पायऱ्यांवर काम एकसारखें चालू असले पाहिजे म्हणजे तो संघ कायम झाला. . ___ कोणत्याहि गोष्टीपैकी अगदी ठोकळ व सर्वांना सहज पटतील अशा थोड्याच बाबींत एकवाक्यता होणे शक्य असते. इतर सर्व बाबींत बहु-मतानेच निर्णय करावा लागतो. हा बहुमताचा निर्णय निमूटपणे मान्य करणे हे प्रत्येक व्यक्तीचे काम असते. समुदायापासून मिळणारा फायदा पदरांत पडण्याठी व्यक्तीने आपले इतके स्वातंत्र्य सोडून द्यावे लागते. विचार करण्याच्या बाबतींत व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. उच्चाराच्या बाबतींत दुसऱ्याच्या मनाला धक्का न लागेल इतकी खबरदारी घेणे अवश्य असते व आचारांत प्रत्येकाच्या तसल्या स्वातंत्र्याला धक्का लागणार नाही हे पाहून वागावे लागते, विचारांत फक्त मेंदूच्या सूक्ष्म हालचाली होत असल्यामुळे त्या कामी विवक्षित प्रकारची शक्ति वापरावी लागते व या शक्तोपासून अपघातहि थोडाच होण्याचा संभव असतो, व म्हणून येथे स्वातंत्र्य जास्त आहे. उच्चारांत छाती, गळा, तोंड, चेहरा वगैरे अवयवांना चालना मिळते व त्या मानाने विचारापेक्षा जास्त शक्तीचा उपयोग करवा लागतो. या जास्त शक्तीचा चुकून दुरुपयोग झाला तर जास्त नुकसान आहे म्हणून येथे स्वातंत्र्य कमी. आचारांत तर