पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र. ११ लोकांना कामे करण्याची उमेद येईल, त्यांच्या हातून अनेक गोष्टी होतील, सगळ्या जगाचे डोळे हिंदुस्थानाकडे लागतील व त्याचे सर्वजण कोडकौतुक करतील असे आम्हांस वाटते. मुख्य उणीव स्वराज्य व त्यांत मिळणारे कामे करण्याचे प्रसंग व बाव यांची आहे असे म्हणतां येते, लामाका MARE हिंदी लोकांना संसार हा एक मोठा बोजा वाटतो इतकेच नव्हे, तर हा बोजा सहन करण्याचे त्यांचे सामर्थ्य अनेक मतमतांतरामुळे छिन्नभिन्न झालेले आहे. हिंदी खांबांतील या मतमतांतराच्या भेगा अनेक बाजूने गेल्या असून या खांबाला बाहेरून आवळून धरणारी स्वराज्याची पट्टी काढून टाकलेली आहे. हिंदी लोकमताचा पारा स्वराज्याच्या बाटलींत घातला, हिंदी चाकाला स्वराज्याची धांव घातली म्हणजे हे वाटेल तो बोजा सहन करण्यास समर्थ आहे. कोणत्याहि देशांत पाहिले तरी जन्म, संपत्ती, धंदा वगैरेवर उच्चनीच भाव आहेतच. अशामाता : वयोजाति कर्म वित्त विद्यामान्य स्थानानि ।। . वय, कूळ, धंदा, द्रव्य व ज्ञान यांवर जगांतील प्रत्येक देशांतील लोकांत भेगा पडलेल्या असतातच. कोणी खाली, कोणी वर, कोणी श्रेष्ठ, कोणी कनिष्ठ, कोणी धनी, कोणी ताबेदार, कोणी लहान, कोणी मोठा, असे भेद सगळीकडेच असतात व या सर्वांना अनुसरून रोटीबेटी व्यवहार वगैरे सर्व देशांत आहेतच. मात्र एकाच जातीत वंशपरंपरा एकच धंदा व त्या धंद्याला अनुसरून आचार, विचार, पोषाक वगैरेंची मर्यादा इतर देशांत हल्ली नाही व ही मर्यादा आमच्याच देशांत काय म्हणून ? असे, ही मर्यादा चांगली कां वाईट याचा सारासार विचार न करता, प्रत्येक जण विचारतो. या उच्चनीचपणामुळे आमचे स्वराज्य गेले म्हणणे म्हणजे हिरवा अंगरखा घातल्यामुळे मला डाव येत नाही असे म्हणण्यासारखे वेडेपणाचे आहे. या मर्यादांचा अतिरेक करणे, जगांत काय चालले आहे याचा विचार न करतां या मर्यादांचा आग्रह धरणे, या मर्यादांतच सर्व काय तें आहे असे समजणे हे वेडेपण होय. राष्ट्रीय सुस्थिति असावी, सर्व व्यवहार सुयंत्रित चालावे, कामें व ऐपती यांची वाटणी नीट व्हावी म्हणून ही ।