पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.] सामाजिक सुधारणा नाड्या ढिल्या होणे, पोटभर अन्न न मिळणे यामुळे शरीरांत ताकद नाहीं व अशक्ततेमुळे दैववादीपणा अशी ही हल्लींची कार्यकारण परंपरा आहे. कित्येक लोक अविभक्त कुटुंबपद्धतीमुळे माणसें पोशी होतात असे म्हणतात; कित्येक लोक फाजील संततीने दारिद्य आले असे म्हणतात; पुनर्विवाहाची चाल नसल्यामुळे घरचा कर्ता पुरुष मेला तर बायकामुलांचे हाल होतात असें कांही म्हणतात; लहानपणी लग्ने केल्याने संसाराची बेडी पडून उत्साह नाहीसा होतो असे कित्येक मानतात; अस्पृश्यतेमुळे, रोटीबेटी व्यवहार होत नाही म्हणून द्वेषबुद्धि वाढते असे कोणी सांगतात; भिक्षा मागणे कायद्याने बंद करून प्रत्येकाला काही तरी काम करणे भाग पाडावे असे काही सुचवितात; श्रीमंतांचा आळस घालवून व चैन बंद करून त्यांना कामाला लावावे असे काही सांगतात; आंधळे, पांगळे, रोगी, वेडे वगैरेंची ब्याद काढून टाकावी असे कित्येकांना वाटते; अनाथांसाठी जिकडे तिकडे जेवणखाण, कपडे व सुखसोईची व्यवस्था केली पाहिजे असे काही प्रतिपादन करतात; फुकट शिक्षण, फुकट औषधपाणी, वगैरे सोई अगोदर चोहोकडे हव्या असे कांही म्हणतात. याप्रमाणे हिंदुस्थानचे दारिद्य व दुःख घालविण्यास अनेकांनी अनेक उपाय सुचविले आहेत. पण बारीक विचाराच्या कसोटीला यांपैकी एकहि उतरत नाही. या सर्वांत अंशतः सत्य असेल पण पूर्ण सत्य यांपैकी एकांतहि नाही हे निर्विवाद आहे व यासाठीच पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तरेकडील सर्व समाजांचे निरीक्षण करून चांगले तेंच घ्यावे असें वर सुचविले आहे. हिंदुस्थानांतील लोकांना याप्रमाणे संसार हा बोजा वाटत असतांना पाश्चात्य लोकांत रगड उत्साह व अत्यंत चळवळ आहे. जगांत हजारों सुधारणा आम्ही घडवून आणणार व यासाठी व्यक्ति व संघाने प्रत्यक्ष काम करून दाखविणार अशी उमेद त्यांना आहे. हिंदुस्थानांत सुद्धा स्वराज्याचे मंद वारे वाहू लागले, एकीची जरा ऊब लागली, यशाचे जरा अंकुर फुटले, परमेश्वरभक्तीचा ओलावा लागला व शिक्षण व विचारविनिमयाचे पाणी मोकळे सर्वत्र खेळू लागले म्हणजे ही स्थिति पार पालटेल. दाट सावली, मंद वारा, शितळ पाणी यांच्या मदतीने हिंदी